लातूर – सन 2021-22 मध्ये युरोपीयन युनियन आणि इतर देशांना द्राक्ष निर्यात करण्यासाठी नोंदणी बंधनकारक करण्यात आलेली असल्याने किटकनाशक उर्वरीत अंश आणि किड रोगाची हमी देण्यासाठी ग्रेपनेट व्दारे द्राक्ष बागांची नोंदणी करण्यात येत आहे.
अपेडाच्या मार्गदर्शनाखाली द्राक्ष पिकाची नोंदणी करणेसाठी ग्रेपनेट प्रणालीव्दारे सुविधा सुरु झालेली आहे, आतापर्यांत 75 शेतकऱ्यानी नोंदणीसाठी अर्ज केलेले आहेत. सर्व द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी सन 2021-22 करीता नोंदणी करण्यासाठी कृषि विभागाच्या कृषि सहाय्य्क/कृषि पर्यवेक्षक /कृषि अधिकारी /तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांचेशी संपर्क साधून त्वरीत अर्ज करावेत. ग्रेपनेटव्दारे नोंदणी प्रक्रीया 25 नोव्हेंबर 2021 पूर्वी पूर्ण करावयाची आहे.तरी विहीत मुदतीमध्ये अर्ज करुन नोदणी करुन घेण्यात यावी.
लातूर जिल्हयातून उत्पादित होणाऱ्या द्राक्षांना विदेशातून विशेष मागणी आहे.तरी जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकऱ्यानी निर्यातीच्या दृष्टीने बागाची नोंदणी करुन घ्यावी असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी , दत्तात्रय गावसाने यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
https://youtu.be/FkhUTw1OjTM