सरकारी कार्यालयात फक्त भगतसिंग अन् आंबेडकरांचा फोटो लागणार, भगवंत मान यांचा धडाका सुरु

पंजाब : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागले. गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तरप्रदेश, उत्तराखंड या पाच राज्यांतील निकाल लागले असून पंजाब सोडता बाकीच्या चार राज्यात भाजपाने आघाडी मारली आहे. तसंच पंजाबमध्ये कॉंग्रेसच निवडून येण्याची दाट शक्यता असताना तिथे आम आदमी पार्टीने आघाडी घेतल्याने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार पंजाबमध्ये यावेळी जनतेने ‘आप’ला पसंती दिली आहे. तर काँग्रेसची सपशेल पिछेहाट झाली आहे. निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार पंजाबमध्ये आपचे तब्बल ९२ उमेदवार आघाडीवर आहेत. तर यावेळी काँग्रेसला मोठा फटका बसला असून, राज्यात सत्तेत असणाऱ्या काँग्रेसने केवळ १९ जागांवर आघाडी घेतली आहे.

या विजयानंतर पंजाबचे होणारे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांनी कामाचा धडाका सुरु केला आहे. त्यांनी पंजाबमधी सरकारी कार्यालयात आता इथून पुढे मुख्यमंत्र्याचा फोटो लागणार नाही. सरकारी कार्यालयात सरदार भगतसिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावण्यात येईल. अशी घोषणा आप नेते आणि पंजाबचे भावी मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांनी केली. याबाबतची माहीती आपच्या अधिकृत ट्वीटरवरून शेअर करणयात आली आहे.