‘ऑपरेशन सिंदूर’ सिनेमाच्या पोस्टरवरून वाद; दिग्दर्शकाची माफी | Operation Sindoor

'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाच्या पोस्टरवरून वाद; दिग्दर्शकाची माफी | Operation Sindoor

Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’ या आगामी चित्रपटाच्या पोस्टरने सोशल मीडियावर चांगलाच गदारोळ उडवून दिला आहे. ९ मे रोजी शेअर करण्यात आलेल्या या पोस्टरवर काही नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अनेकांनी यामध्ये भारतीय सैन्याच्या कारवाईचा संदर्भ असताना त्याचा सादरीकरण चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप केला. या टीकांनंतर चित्रपटाचे दिग्दर्शक उत्तम माहेश्वरी यांनी थेट सोशल मीडियावर माफी मागितली आणि आपला हेतू चुकीचा नव्हता, असा खुलासाही केला.

‘ऑपरेशन सिंदूर’ चित्रपटाची निर्मिती विकी भगनानी फिल्म्स आणि द कंटेंट इंजिनिअर करत असून, या चित्रपटात भारतीय सैन्याच्या पराक्रमाची कहाणी दाखवली जाणार आहे. मात्र, चित्रपटाच्या घोषणा पोस्टरमध्ये वापरण्यात आलेली दृश्ये, डिझाइन आणि AI तंत्रज्ञानामुळे त्याला अनावश्यक वादाला सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर माहेश्वरी यांनी स्पष्टीकरण देत सांगितले की, “मी कोणाच्याही भावना दुखावण्यासाठी हा चित्रपट बनवत नाही. माझा उद्देश भारतीय सैन्याच्या शौर्याची कथा सांगण्याचा आहे.”

वाद वाढल्यानंतर दिग्दर्शक माहेश्वरी यांनी पोस्टर हटवले असून, नवीन पोस्टर लवकरच प्रसिद्ध केलं जाईल असंही सांगितलं आहे. त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की, “हा केवळ सिनेमा नाही, तर देशाच्या भावना आहेत. जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी त्याची माफीनामा देतो.” सोशल मीडियावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना दिग्दर्शकाने केलेल्या या खुल्याशामुळे परिस्थिती शांत होत असल्याचं चित्र आहे.

Previous Post
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची

Next Post
अखेर युद्ध थांबलं, भारत-पाकिस्तान दोन्ही देशांकडून युद्धबंदीला संमती! IndoPakWar

अखेर युद्ध थांबलं, भारत-पाकिस्तान दोन्ही देशांकडून युद्धबंदीला संमती! IndoPakWar

Related Posts
Maharashtra Assembly Elections | विधानसभेची तयारी झाली सुरु; शिवसेनेच्या आमदार-खासदारांची आज बैठक

Maharashtra Assembly Elections | विधानसभेची तयारी झाली सुरु; शिवसेनेच्या आमदार-खासदारांची आज बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत आज आमदार, खासदारांची बैठक होणाराय… येणा-या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections ) कसे सामोरे…
Read More
मुंबईत गिलेन-बॅरे सिंड्रोममुळे पहिला मृत्यू, महाराष्ट्रात आतापर्यंत GBS मुळे ८ जणांचा मृत्यू

मुंबईत गिलेन-बॅरे सिंड्रोममुळे पहिला मृत्यू, महाराष्ट्रात आतापर्यंत GBS मुळे ८ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात गिलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) आजार पसरला ( Mumbai GBS) आहे. पुण्यानंतर आता मुंबईत जीबीएसमुळे पहिल्या मृत्यूची बातमी आहे.…
Read More
Jasprit Bumrah | "डिनरमध्ये काय बनवू?" बुमराह अन् पत्नी संजनाचा ऑनकॅमेरा रोमान्स, Video होतोय व्हायरल

Jasprit Bumrah | “डिनरमध्ये काय बनवू?” बुमराह अन् पत्नी संजनाचा ऑनकॅमेरा रोमान्स, Video होतोय व्हायरल

Jasprit Bumrah | भारतीय क्रिकेट संघाने टी20 विश्वचषक 2024 मध्ये पाकिस्तानचा सहा धावांनी पराभव केला. मात्र हा विजय…
Read More