महिन्यायाकाठी 1 लाख रुपये कमवायची संधी, फक्त 50 हजारामध्ये सुरू करा व्यवसाय

जर तुम्हाला कृषी क्षेत्राशी निगडीत एखादा व्यवसाय करायचा असेल तर नफ्याची हमी देणारा एकमेव व्यवसाय म्हणजे कुक्टूपालन होय. जर तुमच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी जास्त पैसे नसतील तर तुम्ही अवघे 50 हजार रुपये गुंतवणूक करून हा व्यवसाय सुरू करू शकता. 50 हजार ते दीड लाख रुपये गुंतवणूक करून तुम्ही महिन्याकाठी 50 हजार ते एक लाख रुपये इतके उत्पन्न मिळवू शकता.

1500 कोंबड्यांचे लेयर फार्मिंगने सुरुवात करून तुम्ही लाखभर रुपये मिळवू शकता. पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक संस्था आणि बँका देखील आर्थिक मदत करतात.सुरुवातीला छोट्या स्वरूपात व्यवसाय करून नंतर तुम्ही हा व्यवसाय वाढवू शकता. पोल्ट्री व्यवसायात कर्जावर तब्बल 25 टक्के अनुदान मिळते. तसेच sc आणि st वर्गाला प्रोत्साहन देण्यासाठी हे अनुदान 35 टक्क्यांपर्यत मिळू शकते. या व्यवसायाची एक जमेची बाजू म्हणजे यामध्ये काही रक्कम आपल्याला गुंतवणूक करावी लागते तर बाकीची रक्कम बँकेकडून कर्ज म्हणून मिळते.

जर तुम्हाला उत्तम उत्पन्न हवं असेल तर तुम्हाला या व्यवसायात नशीब आजमवण्यासाठी संधी आहेत. सर्वात आधी तुम्ही योग्य प्रशिक्षण घ्यायला हवे. 1500 कोंबड्यांचं लक्ष असेल तर त्यापेक्षा तुम्हाला 10 टक्के अधिक पिल्लं खरेदी करायला हवीत. कारण अवेळी आजारपणामुळे अनेक कोंबड्या दगावतात. सध्या देशांत अंड्याचे दरही वाढत आहेत.ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला एका अंड्याला दर हा सात रुपये एवढा होता. मुख्य म्हणजे अंड्याच्या किंमती सोबत कोंबडीचे भावही वाढले आहेत.

चिकनाला देखील उत्तम भाव मिळाला आहे.त्यामुळे त्यातून देखील उत्तम कमाई होऊ शकते. 1500 कोंबड्या घेण्यासाठी तुम्हाला 50 हजार रुपये लागतात. कोंबड्याचे खाणे आणि शेड यांचा एकूण खर्च पकडा तुम्हाला दीड लाख रुपये यासाठी लागतात.