नवी दिल्ली – हिवाळी अधिवेशनाच्या कालच्या पहिल्याच दिवशी कृषी कायदे रद्द करणारं विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झालं. कृषीमंत्री नरेंद्र तोमर (Narendra Tomar) यांनी लोकसभेत हे विधेयक मांडलं.त्यानंतर या विधेयकावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरल्यामुळे त्या गदारोळातच आवाजी मतदानानं हे विधेयक मंजूर करण्यात आलं.
दुपारनंतर तोमर यांनी राज्यसभेत हे विधेयक मांडलं.सरकारनं शेतकऱ्यांच्या हितासाठी हे कायदे केले, मात्र विरोधकांनी या कायद्यांबद्दल अपप्रचार केल्यामुळेच सरकारनं हे कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, असं तोमर यावेळी म्हणाले. या विधेयकावर चर्चेची मागणी करत विरोधकांनी राज्यसभेतही गदारोळ केला. त्यानंतर राज्यसभेतही आवाजी मतदानानं हे विधेयक मंजूर करण्यात आलं.
दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी गदारोळ घातलेल्या विरोधी पक्षांच्या 12 खासदारांचं चालू अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसांपर्यंत निलंबन करण्यात आलं आहे.
https://youtu.be/FkhUTw1OjTM