पुण्याचं पोरगं जगात चमकलं, दिग्गजांना मागे टाकत आयपीएलमध्ये ऋतूचेच‘राज’

शारजाह : फाफ डु प्लेसिसचे दमदार अर्धशतक, शार्दुल ठाकूरचा भेदक मारा आणि रवींद्र जडेजाची क्षेत्ररक्षणासोबत उपयुक्त गोलंदाजी यामुळे चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सला २७ धावांनी धूळ चारत आयपीएलचे चौथे विजेतेपद नावावर केले आहे.

दुबईच्या मैदानावर रंगलेल्या महामुकाबल्यात चेन्नईचा कप्तान महेंद्रसिंह धोनीने अनुभवाचा पुरेपूर वापर करत महत्त्वाच्या क्षणी सामन्याला कलाटणी दिली. नाणेफेक गमावलेल्या चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना कोलकातासमोर २० षटकात ३ बाद १९२ धावा केल्या. सलामीवीर फाफ डु प्लेसिसने तडाखेबंद ८६ धावांची खेळी केली. त्याला ऋतुराज, उथप्पा आणि मोईन अलीची योग्य साथ मिळाली.

कोरोनामुळे दोन टप्प्यात झालेल्या आयपीएल स्पर्धेत सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम पुण्याच्या ऋतुराज गायकवाडने केला आहे. ऋतुराजने १६ सामन्यात ४५.३६च्या धमाकेदार सरासरीने ६३५ धावा चोपल्या. या धावा करतना १३६.२७च्या स्ट्राईक रेटने ऋतुराजने विरोधी संघाच्या गोलंदाजांचे अक्षरशः पिसे काढली.

ऋतुराजने या संपूर्ण स्पर्धेत ६४ चौकार तर २३ उतुंग षटकार ठोकले. यामध्ये ऋतुराजने ४ अर्धशतके तर धमाकेदार १ शतक ठोकले. ऑरेंज कॅपचा मानकरी असलेला ऋतुराज हा चेन्नईच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला आहे.

हे देखील पहा