पटोलेंच्या विरोधातील प्रक्षोभक भाषेप्रकरणी भाजप नेत्याच्या अडचणी वाढल्या; चौकशीचे आदेश जारी

nana patole

मुंबई – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याविषयी अवमानकारक भाषा वापरल्याबद्दल भाजपा नेते माजी कृषी मंत्री आमदार अनिल बोंडे, नागपूर पूर्व मतदारसंघाचे भाजपा आमदार कृष्णा खोपडे, भाजपा युवा मोर्चा जालनाचे जिल्हाध्यक्ष सुजित जोगस यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीची दखल माझगाव महानगर दंडाधिकारी यांनी घेतली आहे. आझाद मैदान पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक यांनी चौकशी करुन अहवाल सादर करावे असे न्यायालयाने म्हटले आहे.

अमरावती येथे १८ जानेवारीला एका आंदोलात सहभाग घेऊन माजी मंत्री अनिल बोंडे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात अत्यंत प्रक्षोभक भाषा वापरली. अनिल बोंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी धमकावणे, अवमानकरक टिपण्णी करणे, कटकारस्थान रचने, समाजात तेढ निर्माण करणे, दोन गटात तेढ निर्माण होईल असे प्रक्षोभक भाषण करणे, मानहानी करणे, सामाजिक शांतता भंग करणे तसेच कोरोना साथ व प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महारष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या विधी विभागाचे अध्यक्ष ऍड. रविप्रकाश जाधव यांनी माझगाव न्यायालयात तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीची दखल घेत मा. महानगर दंडाधिकारी यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक आझाद मैदान पोलीस स्टेशन यांना कलम १५३, १६५३ अ, १५३ ब १८८, २२० बी, २६९, २७०, २७१, ३४१, ५००, ५०४, ५०५(ii), ५०६, ३४ कलम, भारतीय दंडसंहितेनुसार माजी मंत्री अनिल बोंडे, नागपूर पूर्व मतदारसंघाचे भाजपा आमदार कृष्णा खोपडे व भाजपा युवा मोर्चा जालना जिल्हाध्यक्ष सुजित जोगस यांची चौकशी करुन २३ मार्चपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Previous Post
ind vs sl

टीम इंडियाला मोठा धक्का; ‘हा’ आक्रमक फलंदाज दुखापतीमुळे झाला T20 मालिकेतून बाहेर

Next Post
अशोक गावडे

अमृता फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अशोक गावडेंवर अखेर गुन्हा दाखल

Related Posts
द्रौपदी मुर्मू

कॉंग्रेस-राष्ट्रवादीची मते फुटली; द्रौपदी मुर्मु यांना तब्बल १६ आमदारांनी केले मतदान

मुंबई – राष्ट्रपतीपदी एनडीएच्या (NDA)उमेदवार द्रौपदी मुर्मु (Draupadi Murmu)यांनी विजय मिळवलाआहे. त्यांनी युपीए आणि विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा…
Read More
Breaking : चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर

Breaking : चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर

Pune  : पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड चे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन…
Read More
"मला बदनाम करण्याचा कट", कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांचा आरोप | Chaitanya Maharaj Wadekar

“मला बदनाम करण्याचा कट”, कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांचा आरोप | Chaitanya Maharaj Wadekar

Chaitanya Maharaj Wadekar : आमच्या भांबोली गाव (ता. खेड, जि. पुणे) येथे वडिलोपार्जित जागेतील काही हिस्सा बांधकाम व्यावसायिकाला…
Read More