अदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळ्यात भगवा सप्ताहाचे आयोजन 

करमाळा  –   युवा सेना राज्य सरचिटणीस अमोल किर्तीकर (Yuva Sena State General Secretary Amol Kirtikar) यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे (Yuva Sena chief Aditya Thackeray) यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा तालुका युवा सेनेच्यावतीने भगवा सप्ताह चे आयोजन करण्यात आले असून शिवराज्याभिषेक दिनापासून या कार्यक्रमास सुरुवात होणार असल्याचे युवा सेना समन्वयक शंभुराजे फरतडे (Youth sena Coordinator Shambhuraje Fartade)  यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

दिनांक ६ जुन रोजी करमाळा येथील छत्रपती शिवाजीमहाराज महाराज यांच्या पुतळ्यास राज्याभिषेक दिनानिमित्त महाभिषेक करुन या कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. उपस्थित मान्यवरांच्या शुभाहस्ते  शिवरायांना  महाभिषेक व पुष्पहार अर्पण करण्यात येणार असून या कार्यक्रमास युवा सेना जिल्हाप्रमुख सचिन बागल शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे तालुकाप्रमुख सुधाकर काका लावंड,  तालुका संघटक संजय शिंदे, शहरप्रमुख प्रवीण कटारीया, यांच्यासह केतुरचे माजी उपसरपंच तथा माजी  शिवसेना उपतालुकाप्रमुख अ‍ॅड विकास जरांडे, झरे येथील सरपंच भारत मोरे,गौंडरेचे माजी उपसरपंच शाखा प्रमुख उत्तम हनपुडे, पोथरेचे माजी सरपंच विष्णु रंदवे, आळसुंदेचे, माजी उपसरपंच जोतीराम घाडगे, झरे येथील माजी उपसरपंच विजय माने यांच्या सह शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

दिनांक १३ जुन रोजी  असलेल्या युवा सेना प्रमुख व पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त  गुळसडी , राजुरी  ,निंभोरे ,हिवरे, निमगाव, वरकटणे, गौंडरे येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत वृषारोपन व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे आयोजन  जिल्हा सरचिटणीस दिग्विजय अंबारे ,युवा सेना उपतालुका प्रमुख समाधान यादव,  दादासाहेब तनपुरे, अतुल सांगडे, शशिकांत चव्हाण, सोपान चव्हाण, माधव हनपुडे, गणेश जाधव यांनी केले आहे .वृक्षारोपण कार्यक्रमास दादाश्री फाउंडेशन वीट चे सहकार्य लाभणार आहे.

१९ जुन रोजी शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त आई कमला भवानीची महापूजा व श्री देवीचा माळ येथील मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप तसेच शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे. या वेळी तालुकाप्रमुख सुधाकर लावंड ,शिवसेना संघटक संजय शिंदे, माजी तालुकाप्रमुख शाहुदादा फरतडे ,उपतालुकाप्रमुख श्रीहरी तळेकर, बंडु शिंदे, प्रमोद वागज, भिवा शेजाळ, माजी उपतालुकाप्रमुख विकास जरांडे, महिला आघाडी तालुकाप्रमुख वर्षाताई चव्हाण केम शहर प्रमुख आशाताई काळे , युवती सेना तालुका प्रमुख  वैष्णवी साखरे, युवा सेना उपतालुकाप्रमुख समाधान यादव,अतुल सांगडे, सोशल मिडीया प्रमुख अजयराजे साखरे उपस्थित राहणार आहेत.

दिनांक २६ जुन रोजी शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे यांच्या वाढदिवसानिमित्त व  शिवसेना वर्धापनदिनानिमित्त हिवरे ता करमाळा येथे  सकाळी अकरा वाजता भव्य आरोग्य शिबीर आयोजित केले असुन  या शिबिरात  करमाळा येथील सुप्रसिद्ध रेवती हाॅस्पिटलचे डाॅ. उमेशकुमार जाधव, व डाॅ उर्मिला जाधव हे   रुग्णांची मोफत तपासणी करून औषधोपचार करणार आहेत या शिबिरात महिलांची विशेष तपासणी होणार होणार असून महिलांच्या मासीक पाळी, गरोदर काळातील समस्या यावर मोफत तपासणी औषधोपचार व सल्ला देण्यात येणार आहे. तसेच भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, यांच्या हस्ते होणार असून, युवा सेन विभागीय सचिव अक्षय ढोबळे,विस्तारक उत्तम आयवळे, युवा सेना जिल्हाप्रमुख सचिन बागल , तालुकाप्रमुख सुधाकर लावंड,करमाळा शहर प्रमुख प्रवीण कटारिया माढा उपतालुकाप्रमुख गोरख ताकमोगे, ग्राहक संरक्षण कक्षाचे धनाजी चोपडे, विभाग प्रमुख तानाजी चोपडे करमाळा उपशहर प्रमुख पंकज परदेशी, संतोष गानबोटे,  भालेराव, यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच शिवसेना युवा सेना महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी करमाळा तालुक्यातील जेष्ठ शिवसैनिक तसेच निष्ठावंत शिवसैनिक जेष्ठ नागरिक यांचा सत्कार करण्यात येणार आहे.तसेच कोरोनाकाळात उत्कृष्ट कामगीरी केलेल्या आरोग्य सेवीका, डाॅक्टर, पोलीस, यांचा कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त शिवसैनिक युवा सैनिक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन युवा सेना समन्वयक शंभुराजे फरतडे यांनी केले आहे