Oscars 2023: RRR ने ऑस्करमध्ये इतिहास रचला, ‘नाटू नाटू’ या गाण्याला बेस्ट ओरिजिनल सॉन्गचा पुरस्कार

Oscars 2023: एस. एस. राजामौली दिग्दर्शित RRR या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात इतिहास रचला आहे. बेस्ट ओरिजिनल साँग (सर्वोत्कृष्ट मूळ गाणं) विभागात ऑस्कर पुरस्कार पटकावणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. (Oscars 2023: RRR makes history at Oscars, wins Best Original Song for ‘Natu Natu’).

संगीतकार एम एम कीरावानी यांनी स्टेजवर जाऊन हा पुरस्कार स्वीकारला. ‘नाटू नाटू’ गाण्यानं फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या गाण्याने गोल्डन ग्लोब पुरस्कार देखील पटकावला होता. आता या गाण्याने ऑस्कर पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे. ही भारतासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.

याशिवाय द एलेफंट विस्परर या भारतीय लघुकथापटानं प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरलं. कार्तिकी गोन्साल्व्हिस यांचं दिग्दर्शन असलेल्या या लघुपटाची निर्मिती गुनीत मोंगा यांनी केली आहे. एक दाम्पत्य आणि दोन हत्ती यांच्यातल्या नात्याची गोष्ट यात दाखवण्यात आली आहे.