“आमचं बाळ तुमचं मनोरंजन नाही” – संजना गणेशनची सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

"आमचं बाळ तुमचं मनोरंजन नाही" - संजना गणेशनची सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

sanjana ganeshan | मुंबई इंडियन्सने लखनऊविरुद्धच्या सामन्यात 54 धावांनी दणदणीत विजय मिळवला. जसप्रीत बुमराहने 4 षटकांत केवळ 22 धावा देत 4 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. त्याच्या पत्नी संजना गणेशन आणि दीड वर्षाचा मुलगा अंगद स्टेडियममध्ये उपस्थित होते. बुमराहने विकेट घेतल्यानंतर स्टेडियममध्ये जल्लोष सुरू झाला आणि कॅमेऱ्यांनी संजनाकडे व अंगदकडे वळत काही दृश्ये टिपली. काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि अंगदच्या हावभावांवर चर्चा सुरू झाली, ज्यामुळे संजना संतप्त झाली.

इंस्टाग्राम स्टोरीवर प्रतिक्रिया देताना संजना (sanjana ganeshan) म्हणाली, “आमचा मुलगा तुमच्या मनोरंजनाचा विषय नाही. जसप्रीत आणि मी अंगदला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो, कारण इंटरनेट हे एक घृणास्पद आणि घाणेरडे ठिकाण आहे.” तिने स्पष्ट केलं की ते फक्त जसप्रीतला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये होते आणि मुलाला चर्चेचा विषय होऊ द्यायचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता.

पुढे बोलताना संजना म्हणाली, “तो फक्त दीड वर्षांचा आहे. अशा एका छोट्या मुलाच्या संदर्भात ट्रॉमा आणि नैराश्य यांसारखे शब्द वापरणे हे आपल्या समाजाच्या घसरलेल्या मानसिकतेचे द्योतक आहे. लोकांनी थोडी प्रामाणिकता आणि दयाळूपणा दाखवायला हवा.” तिच्या या स्पष्ट शब्दांनी अनेकांना विचार करायला भाग पाडलं आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

आता तरी राहुल गांधींचं डोकं ताळ्यावर येईल, चंद्रशेखर बावनकुळेंचा निशाणा

राष्ट्रीय सुरक्षेसाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सर्व माध्यमांना निर्देश

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासोबत उभे जागतिक नेते; एनआयएकडे तपास सोपवला

Previous Post
पाकिस्तानी नागरिकांवर कारवाई : मुदत संपल्यानंतर अटक करण्याचा इशारा

पाकिस्तानी नागरिकांवर कारवाई : मुदत संपल्यानंतर अटक करण्याचा इशारा

Next Post
पाकिस्तानी लीग सोडून बॉशचं मुंबई इंडियन्सकडून पदार्पण

पाकिस्तानी लीग सोडून बॉशचं मुंबई इंडियन्सकडून पदार्पण

Related Posts
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नाची पत्रिका लीक, लग्नाची तारीख समोर

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नाची पत्रिका लीक, लग्नाची तारीख समोर

दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य लवकरच त्याची प्रेमिका शोभिता धुलिपालासोबत लग्नगाठ बांधणार आहे. नागा चैतन्यच्या लग्नाचे कार्ड सोशल मीडियावर…
Read More
आयपीएल लिलावाची तारीख आणि ठिकाण जवळजवळ निश्चित, केव्हा आणि कुठे होणार मेगा लिलाव?

आयपीएल लिलावाची तारीख आणि ठिकाण जवळजवळ निश्चित, केव्हा आणि कुठे होणार मेगा लिलाव?

आयपीएल 2025 च्या मेगा लिलावाची (IPL Auction 2025) तयारी जोरात सुरू आहे. मेगा लिलावाचे ठिकाण आणि तारीख जवळपास…
Read More
Salman Khan Movie | सलमान खानला सुपरस्टार बनवणाऱ्या चित्रपटाची तिकिटे ब्लॅकने विकून एका व्यक्तीने खरेदी केले होते 2 फ्लॅट

Salman Khan Movie | सलमान खानला सुपरस्टार बनवणाऱ्या चित्रपटाची तिकिटे ब्लॅकने विकून एका व्यक्तीने खरेदी केले होते 2 फ्लॅट

‘हम आपके है कौन’ हा सिनेमा 1994 मध्ये रिलीज ( Salman Khan Movie) झाला होता. आता हा चित्रपट…
Read More