आमची शिवसेना राष्ट्रवादीची शिवसेना; ठाकरे गटाने केले अखेर मान्य

नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेसकडे शिवसेना (Shivsena) गहाण ठेवली आहे, असा आरोप वारंवार केला जातो. यासोबतच शिवसेना राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली असल्याचाही आरोप होतो, मात्र आजपर्यंत ठाकरे गटाचे नेते हे आरोप फेटाळून लावत होते. पण पहिल्यांदाच शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याने हे मान्य केलंय.

आमची शिवसेना, राष्ट्रवादीची शिवसेना या जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या वाक्यावर या नेत्याने सहमती दर्शवली आहे. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav)यांनीच हे मान्य केले आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेच्या काही सेकंद आधीचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

आमची शिवसेना, राष्ट्रवादीची शिवसेना, त्यावर भास्कर जाधव हसतात आणि होकार देतात. त्या वक्तव्याचा पुनरुच्चारही करतात.माध्यमांचे माइक लागत होते. पत्रकार परिषदेसाठी तयारी सुरु होती. यावेळी जयंत पाटील आणि भास्कर जाधव यांच्यादरम्यान झालेल्या संवादाचा हा व्हिडिओ आहे.