चित्रकला आणि शिल्पकला हे देखील साहित्यच – छगन भुजबळ

bhujbal

आडगाव –  चित्रकला आणि शिल्पकला हे देखील साहित्यच आहे त्यामुळे त्याचा देखील आम्ही सन्मान करतो असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. कविवर्य कुसुमाग्रजनगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी आडगाव येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ऐसी अक्षरे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अच्युत पालव यांचे कॅलिग्राफी प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भेट देऊन छगन भुजबळ यांनी अच्युत पालव व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना ते म्हणाले आपल्या साहित्य संमेलनाचा परीघ ह्या वर्षी आपण वाढवला आहे. त्यात बालकवी कट्टा, चित्रकला, कॅलिग्राफी , शिल्पकला प्रदर्शनाचा कार्यक्रम देखील घेतला आहे. साहित्य आणि चित्रकला ही आपल्याला नेहमी विचार करायला भाग पडतात आणि साहित्य, चित्रकलेतून मनात अनेक तरंग उठतात असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले

यावेळी बोलताना अच्युत पालव म्हणाले की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात चित्रकलेला आदरपूर्वक दिलेला सन्मान दिला याचा आनंद होत आहे अश्या भावना व्यक्त केल्या. यावेळी माजी खासदार तथा संमेलनाचे समन्वयक समीर भुजबळ, विश्वास ठाकूर,जयप्रकाश जातेगावकर, प्राचार्य प्रशांत पाटील यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

Previous Post
निवडणुकांमुळे लोकशाहीचा ढाचा अबाधित; मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचा दावा 

निवडणुकांमुळे लोकशाहीचा ढाचा अबाधित; मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचा दावा 

Next Post
जय भीम

जय भीम चित्रपटाच्या शिरपेचात मानाचा तुरा; गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी नामांकन

Related Posts
विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ

विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ

Hemant Rasne– केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती नोंदणी करण्या करता दिनांक २८ नोव्हेंबर ते २६ जानेवारी अशा…
Read More
shivsena vs bjp

मुंबई महापालिकेवर कुणाचा भगवा फडकणार? सट्टा बाजारात ‘या’ पक्षाला पसंती 

मुंबई – मुंबई महापालिकेवर विजय मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेत जोरदार संघर्ष पाहायला मिळत असतानाच सट्टा बाजारात भाजपची चलती…
Read More
मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेबरोबर २५ वर्षे भाजपाच सत्तेत होता हे मोदी कसे विसरले?

मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेबरोबर २५ वर्षे भाजपाच सत्तेत होता हे मोदी कसे विसरले?

मुंबई  – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील विकास कामांचे उद्घाटन करताना विरोधी पक्षांवर टीका केली. विरोधी पक्षाचे…
Read More