VIDEO : पाकड्याच्या खेळाडूचे लज्जास्पद कृत्य, सहकाऱ्याला चालू सामन्यात दिली ठेऊन !

नवी दिल्ली : पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) सतत वादाच्या भोवऱ्यात साफडत आहे.. जेम्स फॉकनरचा वाद अजूनही पूर्णपणे थंडावला नव्हता तोच आणखी एक लज्जास्पद कृत्य समोर आले आहे. पीएसएलच्या एका सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये गोलंदाज क्षेत्ररक्षकाला कानामागे मारताना दिसत आहे.

सोमवारी पीएसएलचा अंतिम सामना खेळवण्यात आला. हा सामना लाहोर कलंदर आणि पेशावर जाल्मी यांच्यात झाला. हा सामना अतिशय रोमांचक होता. पेशावर जाल्मीने प्रथम खेळताना 7 बाद 158 धावा केल्या आणि लाहोर कलंदरने प्रत्युत्तरात तेवढ्याच धावा केल्या आणि सामना बरोबरीत सुटला. यानंतर सुपर ओव्हरमध्ये पेशावर जाल्मीचा संघ विजयी झाला.

मात्र, लाहोर कलंदरचा वेगवान गोलंदाज हरिस रौफने सामन्यादरम्यान अशी काही कृती केली जी आता चर्चेचा विषय ठरत. विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशनदरम्यान त्याने आपल्या टीमचा खेळाडू कामरान गुलामला कानामागे मारली.

दरम्यान, कामरान गुलामने हरिस रौफच्या गोलंदाजीवर पेशावर जाल्मीच्या हजरतुल्ला जजईचा झेल सोडला. मात्र, त्याच षटकात हारिस रौफने हजरतुल्ला जजईला फवाद अहमदकरवी झेलबाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. विकेट गेल्यानंतर सर्व खेळाडूंनी त्याचा आनंद साजरा करण्यास सुरुवात केली. अशा स्थितीत कामरान गुलाम हा हरीश रौफकडे सेलिब्रेशनसाठी गेला असता त्याने कामरानला कानशिलात लगावली. मात्र, यावर कामरानने कोणतीही प्रतिक्रिया न देता तो गप्प राहिला.

पहा व्हिडीओ