भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा शेअर बाजार ( Pakistan Stock Market) मोठ्या प्रमाणावर घसरला आहे. सोमवारी सकाळी बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आणि गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली. KSE-100 निर्देशांक तब्बल १,३४२ अंकांनी घसरून ७३,००० च्या खाली आला.
हे अचानक आलेलं घसरणीचं ( Pakistan Stock Market) रूप केवळ राजकीय तणावामुळेच नाही, तर पाकिस्तानच्या आर्थिक संकटामुळेही आहे. देशातील महागाई वाढ, परकीय गुंतवणुकीचा अभाव आणि घसरलेली चलनवाढ यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे. यावर भर म्हणजे भारतासोबतचं वाढतं तणाव, ज्याने बाजारात आणखी अनिश्चितता निर्माण केली आहे.
तज्ज्ञांच्या मते, जर ही स्थिती अशीच कायम राहिली, तर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो. परकी गुंतवणूक आणखी कमी होईल, स्थानिक गुंतवणूकदार सावध राहतील आणि देशाची आर्थिक कंबरडे मोडू शकते. त्यामुळे तणाव कमी करून आर्थिक स्थिरतेसाठी प्रयत्न करणे पाकिस्तानसाठी अत्यावश्यक ठरणार आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
“भारताने खरेदी केली २६ राफेल-मरीन विमाने, फ्रान्सबरोबर ६३,००० कोटींचा करार”
महाराष्ट्रासाठी भाऊ एकत्र येतात, मग आपण का नाही?; ओवैसींची मुस्लिमांना साद
MHT-CET परिक्षेतील घोटाळ्याची चौकशी करा, पेपरमधील चुकांचे गुण विद्यार्थ्यांना द्या