‘आर्यन खान अगदी तसाच आहे, जसा तो…’, शाहरुख खानच्या मुलाबद्दल पलक तिवारी काय बोलली?

Mumbai-  सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा चित्रपट 21 एप्रिलला रिलीज होणार आहे. या चित्रपटात मोठी स्टारकास्ट असून प्रत्येकजण त्याचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari) हीदेखील या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. तिने या चित्रपटाच्या प्रोमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानविषयी (Aryan Khan) काही गोष्टी सांगितल्या आहेत, जे फार क्वचित लोकांना माहीत असेल. आर्यनची पर्सनॅलिटी कशी आहे, याबद्दल ती व्यक्त झाली.

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत पलक तिवारीला प्रश्न विचारण्यात आला होता की, आर्यन खान कसा आहे? त्यावर ती म्हणाली, “तो अगदी तसाच आहे, जसा तो दिसतो. तो खूप कमी बोलतो मात्र जे बोलते ते फारच कामाचं असतं आणि पुन्हा तो त्याच्या कामात व्यस्त होतो.”

“तो तसाच आहे. आर्यन फार प्रेमळ आणि शांत राहणारा मुलगा आहे. तो पार्ट्यांमध्येही स्वत:मध्येच मग्न असतो. जर तुम्ही त्याच्याशी बोलतात, तरच तो तुमच्याशी बोलतो. आर्यन खान हा मितभाषी आहे”, असंही तिने पुढे सांगितलं.