बीडचा जवान सिक्कीममध्ये बेपत्ता, पालकमंत्री Dhananjay Munde यांनी कुटुंबियांना संपर्क करून दिला धीर

बीड जिल्हाधिकाऱ्यांपासून दिल्लीपर्यंत मुंडेंचे फोन, बेपत्ता जवानाचा शोध घेण्यासाठी विशेष प्रयत्न करायच्या सूचना

Dhananjay Munde  – सिक्कीम मध्ये मंगळवारी पहाटे झालेल्या ढगफुटी मध्ये बीड जिल्ह्यातील पांडुरंग तावरे हे देश सेवेसाठी तैनात असलेले जवान मागील तीन दिवसांपासून बेपत्ता असून त्यांच्याबद्दल सलामतीची माहिती मिळण्यासाठी हैराण असलेल्या कुटुंबीयांना आज जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी संपर्क करून धीर दिला आहे.

सदर जवानाची माहिती तातडीने मिळावी व त्यांचा शोध घेऊन त्याची माहिती कुटुंबीयांपर्यंत तातडीने पोहोचवली जावी याबाबत धनंजय मुंडे यांनी बीडचे जिल्हाधिकारी ते दिल्लीपर्यंत यंत्रणांना दूरध्वनी द्वारे सूचना करून जवान पांडुरंग तावरे (Pandurang Tawre) यांच्या शोधासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

धनंजय मुंडे यांनी बीड येथे राहत असलेल्या पांडुरंग तावरे यांच्या पत्नी व अन्य कुटुंबियांशी दूरध्वनीवरून संपर्क करत त्यांना धीर दिला. पांडुरंग तावरे हे गेले 14 वर्ष देशसेवेत असून, ते कर्तव्यावर गंगटोक (सिक्कीम) येथे तैनात होते.

https://www.youtube.com/watch?v=oeWKaNTD4g8&t=4s

महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादी काँग्रेसने लोकशाहीची तत्त्वे आणि जनतेची इच्छा सातत्याने जोपासली आहे – राष्ट्रवादी

निवडणूक आयोगाचा पेपर फुटलेला नाही तर हा पेपर स्वच्छ समोर आहे – Sunil Tatkare

राज्यातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या अडचणी व समस्या राज्यपालांनी सोडवाव्यात :- Nana Patole