लालूंच्या सरकार विरोधात आंदोलन केल्याने पंकज त्रिपाठी यांना खावी लागली होती जेलची हवा 

मुंबई : हिंदी सिनेमा जगतामध्ये अभिनेता पंकज त्रिपाठी यांचे नाव आज मोठ्या आदराने घेतले जाते. पंकज त्रिपाठी हे आज बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय असे अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी साकारलेल्या विविध भूमिका आज प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेल्या आहेत. मिरजापूर मधील ‘कालीन भैया’ असो किंवा ‘सेक्रेड गेम्स -२’ मधील गणेश गायतोंडे याचे  गुरुजी. प्रत्येक भूमिकेला त्यांनी न्याय देण्याचा केलेला प्रयत्न आपल्याला सहज लक्षात येईल.

1993 मध्ये पंकज हे जेव्हा महाविद्यालयीन विद्यार्थी होते तेव्हा ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करत होते. बिहारमध्ये त्यावेळी लालू प्रसाद यादव यांचे सरकार होते. राज्य सरकारच्या निषेधार्थ झालेल्या एका आंदोलनात ते सहभागी झाले होते आणि त्यानंतर 7 दिवस तुरूंगाची हवा देखील खावी लागली.पंकज यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की त्या काळात त्यांनी जेलमधील ग्रंथालयात सर्वाधिक वेळ घालवला. पुढे एनएसडी सोडल्यानंतर पंकज मुंबईत शिफ्ट झाले.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की,‘मी 16 ऑक्टोबर 2004 रोजी मुंबईला पोहोचलो. तेव्हा त्यांच्याकडे 46000 रुपये होते. पण पुढे दिवस एवढे खराब झाले कि खिशात केवळ 10 रुपये शिल्लक राहिले होते. मला अजूनही ही तारीख चांगली आठवते. कारण त्यादिवशी पत्नीचा वाढदिवस होता. आणि केक विकत घेण्यासाठी देखील माझ्याकडे पैसे नव्हते.

पंकज त्रिपाठी यांचा जन्म गोपाळगंज बिहारमध्ये झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पंकज यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण पाटणा येथून पूर्ण केले. त्यांनी कॉलेजच्या काळापासूनच पाटण्याच्या थिएटरमध्ये अभिनय करण्यास सुरवात केली होती. पुढे  अभिनयाचे प्रशिक्षण घेण्यासाठी त्याने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला.

पंकज त्रिपाठी यांनी वर्ष 2004 मध्ये अभिषेक बच्चन आणि भूमिका चावला स्टारर फिल्म रनमधून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली होती. या चित्रपटात त्याने चोराची भूमिका केली होती. यानंतर त्याने बर्‍याच चित्रपटांमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत.

हे हि पहा :