Paris Olympics 2024 | ऑलिम्पिकमध्ये नवा वाद! पुरूषाची स्त्री झाली, प्रतिस्पर्धी तरुणीला 46 सेकंदात केलं ‘आऊट’

Paris Olympics 2024 | ऑलिम्पिकमध्ये नवा वाद! पुरूषाची स्त्री झाली, प्रतिस्पर्धी तरुणीला 46 सेकंदात केलं 'आऊट'

पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या (Paris Olympics 2024) सहाव्या दिवशी, एक मोठा वाद दिसून आला ज्यामध्ये इटलीच्या अँजेला कॅरिनी आणि अल्जेरियाच्या इमान खेलिफ यांच्यातील सामना महिला बॉक्सिंगच्या वेल्टरवेट प्रकारात फक्त 46 सेकंदातच संपला. बॉक्सिंगचा हा महत्वाचा सामना इतक्या लवकर संपल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. इटालियन बॉक्सर अँजेला कॅरिनीला इमाम खलिफने इतका जोरात फटका मारला की ती रडू लागली आणि नंतर तिने सामना सोडला. यानंतर, पॅरिस ऑलिम्पिकमध्येही (Paris Olympics 2024) एक नवीन वाद सुरू झाला. खरे तर इमाम खेलिफ ही बॉक्सर आहे, जो सुरुवातीला पुरुष होता आणि ती एक महिला बनलीय आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने गेल्या वर्षी तिच्यावर बंदी घातली होती.

कॅरिनीच्या चेहऱ्यावर दोनदा प्रहार झाला आणि दोनदा तिच्या कोपऱ्यात गेली. कॅरिनी इमानेचे फटके सहन करू शकत नव्हती. या पराभवानंतर कॅरिनी रिंगमध्येच ढसाढसा रडू लागली. लिंगबदल करून पुरूषाची स्त्री झालेल्या इमाने खेलिफविरुद्ध आणि कॅरिनीसाठी आता जगभरात आवाज उठवला जात आहे. पुरुषाच्या बळावर त्यांना स्पर्धा करायला लावणे योग्य नसल्याचे महिला खेळाडूंचे म्हणणे आहे. अल्जेरियाची इमाने खेलिफ ही आधी पुरूष होती. त्यानंतर तिने लिंगबदल केला होता. त्यामुळे आता ऑलिम्पिक कमिटीच्या निर्णयावर वाद निर्माण झाला आहे.

खेलिफची निवड योग्य?
इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशनने लिंग चाचण्यांमध्ये खेलिफ अयशस्वी ठरल्यानंतर अल्जेरियन ऑलिम्पियनला 2023 च्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमधून अपात्र ठरवण्यात आलं होतं. रॉयटर्सच्या मते, खेलिफमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढलेली आढळली होती. अशातच आता खेलिफला ऑलिम्पिक खेळण्याची मान्यता कुणी दिली? असा सवाल विचारला जात आहे. तर काहींनी खेलिफची निवड योग्य असल्याचं देखील म्हटलं आहे.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने खेलीफला स्पर्धेसाठी मंजुरी दिली होती. ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष उमर क्रेमलेव्ह यांनी त्यावेळी या निर्णयाचे स्पष्टीकरण दिलं. डीएनए चाचण्यांच्या आधारे, आम्ही अशा अनेक खेळाडूंची ओळख पटवली होती. चाचण्यांच्या निकालांनुसार, त्यांच्यात XY गुणसूत्र असल्याचं सिद्ध झालं, अशा खेळाडूंना स्पर्धेतून आधीच वगळण्यात आलं होतं, अशी माहिती उमर क्रेमलेव्ह यांनी रशियाच्या टास न्यूज एजन्सी दिली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Eknath Shinde | कुणाला संपवायचं असेल तर मनगटात दम लागतोय; एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर

CM Annapurna Yojana | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा, वर्षाला ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत असणार

Jitendra Awhad car attack | जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला, स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बांबूने फोडली गाडी

Previous Post
Murlidhar Mohol | रेल्वेच्या पुणे विभागाचे विषय लवकरच मार्गी लागणार; मुरलीधर मोहोळ आणि अश्विनी वैष्णव यांच्यात सविस्तर चर्चा

Murlidhar Mohol | रेल्वेच्या पुणे विभागाचे विषय लवकरच मार्गी लागणार; मुरलीधर मोहोळ आणि अश्विनी वैष्णव यांच्यात सविस्तर चर्चा

Next Post
Ajit Pawar | कोल्हापूरच्या, महाराष्ट्राच्या मातीतल्या या सुपुत्राच्या कामगिरीने महाराष्ट्राचा गौरव वाढवला

Ajit Pawar | कोल्हापूरच्या, महाराष्ट्राच्या मातीतल्या या सुपुत्राच्या कामगिरीने महाराष्ट्राचा गौरव वाढवला

Related Posts
अरुण निटूरे

सर्वच राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली; राज्यसभा निवडणुकीत आणखी एका उमेदवाराची एन्ट्री

मुंबई – राज्यसभा निवडणुकीमुळे (Rajya Sabha elections) सध्या राज्यातील वातावरण तापले असून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजप…
Read More
Pakistan Cricketer | "तू इंडियन असशील", पाकिस्तानी क्रिकेटरची चाहत्याशी हमरीतुमरी, पत्नीला हात झटकत अंगावर गेला धावून

Pakistan Cricketer | “तू इंडियन असशील”, पाकिस्तानी क्रिकेटरची चाहत्याशी हमरीतुमरी, पत्नीला हात झटकत अंगावर गेला धावून

Pakistan Cricketer | 2024 च्या टी20 विश्वचषकात पाकिस्तान क्रिकेट संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली. पाक संघ सुपर 8…
Read More

Business Idea : आयुष्यात जबरदस्त पैसा कमावण्यासाठी ‘या’ व्यवसायात करा एकदाच गुंतवणूक

Mumbai : जर तुम्हाला बॉक्सच्या बाहेर काही नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला एक चांगली…
Read More