New Delhi Railway Station Stampede | शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाली. यामध्ये १८ जणांचा मृत्यू झाला. गंभीर जखमींची संख्याही खूप जास्त असल्याने ही संख्या आणखी वाढू शकते. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या अपघातात १४ महिलांचा मृत्यू झाला आहे. तर २५ हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
प्रत्यक्षदर्शींकडून वेगवेगळे दावे येत आहेत. कोणीतरी सांगितले की अपघात प्लॅटफॉर्म क्रमांक १३-१४ वर झाला तर कोणी म्हटले की पुलावर चेंगराचेंगरी झाली. काही जण म्हणत आहेत की ट्रेनचा प्लॅटफॉर्म बदलण्याच्या घोषणेमुळे घबराट पसरली तर काही जण म्हणाले की कोणत्याही प्रकारची घोषणा झाली नाही, दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर ट्रेन उभी असल्याचे पाहून लोक त्याकडे धावू ( Delhi Railway Station Stampede) लागले.
खरे तर, महाकुंभासाठी जाणाऱ्या दोन गाड्या उशिराने धावत होत्या, त्यामुळे स्टेशनवर मोठ्या संख्येने लोक जमले होते. हे लोक त्यांच्या ट्रेनची वाट पाहत होते. दरम्यान, अचानक प्लॅटफॉर्म बदलण्याची घोषणा झाल्यामुळे लोक एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर धावू लागले, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, घटनेनंतर जखमींना मदत करण्यासाठी सुमारे ४५ मिनिटे लागली.
आरोप-प्रत्यारोपांचा फेरा
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूपासून ते पंतप्रधान मोदींपर्यंत सर्वांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या प्रकरणात केंद्र सरकारला घेरले आहे. त्यांनी रेल्वेच्या गैरव्यवस्थापनावरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
भरपाईची घोषणा
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील घटनेत बाधित झालेल्या लोकांना भरपाई जाहीर करण्यात आली आहे. सरकार मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची भरपाई देईल. यासोबतच गंभीर जखमींना अडीच लाख आणि किरकोळ जखमींना १ लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
२०१९ पूर्वीच्या गाड्यांसाठी HSRP नंबर प्लेट बंधनकारक; ३१ मार्चची अंतिम मुदत
अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ, ‘शीशमहल’ प्रकरणी CVC चे चौकशीचे आदेश