‘संभाजीराजेंसाठी पवार ठाकरे पॅाजिटिव्ह आहेत, संजय राऊत तुम्हाला किमंत चुकवावी लागेल’

मुंबई – शिवसेना छत्रपतींसोबत जो अटी शर्थीनचा खेळ खेळत आहे. हा महाराष्ट्रातील जनतेला आवडलेला नाही आहे. तसच शिवसेने व्यक्तिरिक्त बाकी पक्ष जी बघ्याची भूमिका घेत आहेत ते ही महाराष्ट्राला व आम्हाला आवडलेलं नाही.

त्यामुळे शिवसेनेने तात्काळ पाठिंबा जाहीर करावा नाहीतर मतांची बेरीज कशी गोळा करायची हे आम्हाला चांगलेच जमते. असं छावाप्रमुख धनंजय जाधव यांनी म्हटलं आहे.

ते म्हणाले,  शिवसेनेने या आधी प्रितिश नंदी, नारायण आठवले, राजकुमार धुत, चंद्रिका केनिया, मुकेश पटेल, एकनाथ ठाकूर, भरतकुमार राऊत यांना खासदारकी देताना शिवसेनेत प्रवेश करणे सक्तीचे केले होते का? किंवा शिवबंधन बांधले होते का? मग आता संभाजीराजेंनाच का..? पण सेनेला छत्रपतींसोबत न्याय करायचा नसेल तर आमच्या मतांवर पुढच्या वेळी तुमचे आमदार निवडून येतात कसे हे आम्ही पाहूच.

42 मतांचा आकड्याची जुळवाजुळव आम्ही सुरू केली आहे. 5/6 मते कमी आहेत त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. राज्यसभेच्या ६ व्या जागेच्या बाबतीत नाक खुपसु नये. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व शरदचंद्र साहेब पॅाजिटिव्ह आहेत. संजय राऊत तुम्हाला किमंत चुकवावी लागेल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.