पवारांचा खोटारडेपणा म्हणजे संविधानाचा अपमान! बावनकुळे यांची टीका

पवारांचा खोटारडेपणा म्हणजे संविधानाचा अपमान! बावनकुळे यांची टीका

Chandrashekhar Bawankule | शरद पवार यांचा मी सन्मान करतो. त्यांना दीर्घ राजकीय अनुभव आहे, परंतु त्यांनी या वयामध्ये अशा प्रकारचा खोटारडेपणा करणे, जनतेला कन्फ्युज करणे अयोग्य आहे. एक प्रकारे ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा अपमान आहे, अशी परखड टिका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

राज्यात झालेला त्यांनी पराभव स्वीकारलं पाहिजे, असे सांगून बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, जेव्हा पराभव स्वीकारता येत नाही तेव्हा जनतेला कन्फ्युज करण्यासाठी व आपलं अपयश लपवण्याचं काम ते करत असून, जनतेने तर विधानसभामध्ये दाखवून दिले म्हणून ईव्हीएम मशीनवर दोष देऊन पुन्हा आपलं अपयश लपवण्याचे पाप पवार करत आहेत.

विधान भवन परिसरात बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule) माध्यमांशी बोलताना म्हणाले, विधानसभेमधील त्यांचा अत्यंत मोठा पराभव झाला आहे.जनतेने त्यांना नाकारले म्हणून आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पराभवाची भीती असल्यामुळे आपले जनमत वाचवण्याकरिता शरद पवार पुन्हा प्रयत्न करत आहेत आणि मारकडवाडीमध्ये आलेली जी लोक आहेत ती पवार यांची कार्यकर्तेमंडळी आहेत. मारकडवाडीतील जनता त्यात कुठे आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्र नौटंकीला कंटाळला!
मला वाटतं जनतेला सगळ समजले आहे .महाराष्ट्र या नौटंकी ला कंटाळलेला आहे. महाराष्ट्र हा विकासाच्या बाजूने आहे. महाराष्ट्राला महायुतीकडून अपेक्षा आहे आणि महायुतीचे सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र प्रचंड ताकदवान बनणार आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

“मी असताना महायुतीत राज ठाकरेंची काय गरज”, रामदास आठवलेंचा खोचक टोला

बीएमसी निवडणुकीत उद्धव एकटेच लढणार? महाविकास आघाडी तुटण्याचे मिळतायंत संकेत!

लातूरमधील 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाची नजर! शेतकऱ्यांना पाठवल्या नोटीस

Previous Post
पुणे पुस्तक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 'शांतता...पुणेकर वाचत आहे' उपक्रम उत्साहात होणार

पुणे पुस्तक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘शांतता…पुणेकर वाचत आहे’ उपक्रम उत्साहात होणार

Next Post
“गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी घशात घालून…”, वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी राज ठाकरे मैदानात

“गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी घशात घालून…”, वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी राज ठाकरे मैदानात

Related Posts
मराठमोळ्या अभिनेत्याचं ८५ टक्के निकामी झालं होतं फुफ्फुसं; म्हणाला, "सर्जरीनंतर जवळपास पांगळा झालो होतो"

मराठमोळ्या अभिनेत्याचं ८५ टक्के निकामी झालं होतं फुफ्फुसं; म्हणाला, “सर्जरीनंतर जवळपास पांगळा झालो होतो”

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक विद्याधर चौधरी हे गेल्या काही वर्षांपासून गंभीर आजाराने त्रस्त आहेत. या आजाराबद्दल त्यांना…
Read More
vivek Choudhary

महाराष्ट्राचे सुपुत्र एअर मार्शल विवेक चौधरी नवे वायुदल प्रमुख

नवी दिल्ली : नांदेड जिल्हयाचे सुपुत्र एअर मार्शल विवेक चौधरी हे ३० सप्टेंबर २०२१ रोजी भारतीय वायुदलाचे प्रमुख…
Read More
कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावण्याचं पाप उदयनिधीने केलंय; शिंदेंचा हल्लाबोल

कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावण्याचं पाप उदयनिधीने केलंय; शिंदेंचा हल्लाबोल

Udayanidhi : INDIAआघाडीतील प्रमुख पक्ष असणाऱ्या आणि तमिळनाडूतील सत्तारुढ द्रमुक सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (Chief…
Read More