India Champions Trophy 2025 Pakistan : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाईल, हे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) चे अध्यक्ष मोहसिन रझा नक्वी यांचे विधान आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणत्याही हायब्रीड मॉडेलचा विचार केला जाणार नसल्याचेही नक्वी यांनी आयसीसीला स्पष्ट केले आहे. हे संपूर्ण प्रकरण भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानात जाण्यावरुन सुरू झाले आहे. बीसीसीआयकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आले नसले तरी मीडिया रिपोर्ट्सनुसार टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार नाही.
19 जुलै रोजी कोलंबोमध्ये आयसीसी अधिकाऱ्यांची बैठक होणार होती. रिपोर्टनुसार, पीसीबीने हायब्रिड मॉडेलचा विचार केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले, पीसीबी चेअरमन मोहसिन रझा नक्वी यांनी आयसीसीला स्पष्ट केले आहे की चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे आयोजन पाकिस्तान करेल, ज्यासाठी कोणतेही हायब्रीड मॉडेल लागू केले जाणार नाही. भारताला पाकिस्तानात आणणे हे आयसीसीचे काम आहे, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नाही.
प्रस्तावित वेळापत्रकाला यापूर्वीच ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे
काही आठवड्यांपूर्वी पीसीबीने पाठवलेल्या प्रस्तावित वेळापत्रकाला आयसीसीने ग्रीन सिग्नल दिला होता. त्या वेळापत्रकानुसार टीम इंडियाचे सर्व सामने लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळवले जातील. जर भारत उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरीत पोहोचला तर ते सामनेही लाहोरमध्ये खेळवले जातील. वेळापत्रकानुसार कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 1 मार्च रोजी होणार आहे. भारत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात न आल्यास याआधी असेही वृत्त आले होते. अशा परिस्थितीत पाकिस्तानचा संघ 2026 साली होणारा टी-20 विश्वचषक खेळायला जाणार नाही, जो भारताचे यजमानपद भूषवणार आहे.
यापूर्वी आशिया चषक 2023 देखील वादाचा विषय बनला होता, ज्याचे आयोजन पाकिस्तानने केले होते. टीम इंडियाने पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता, त्यामुळे भारताचे सामने श्रीलंकेत आयोजित करण्यात आले होते. पण यावेळी पीसीबीने हायब्रीड मॉडेलबाबत अत्यंत कडक वृत्ती स्वीकारली आहे.
महत्वाच्या बातम्या-
Nana Patole | काँग्रेस पक्ष महाराष्ट्राचा स्वाभिमान राखणार, राज्याला गुजरातचा गुलाम होऊ देणार नाही
Suryakumar Yadav | सूर्यकुमार यादवला टी20 संघाचा कर्णधार बनणं पडलं महागात! वनडेतून झाला बाहेर