लोकं उठसुट शरद पवारांवर जातीचे आरोप करतात – सुप्रिया सुळे

ठाणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray ) यांची बहुचर्चित सभा नुकतीच औरंगाबादेत (Aurangabad) पार पडली. आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार केल्याने अवघ्या देशाचे लक्ष राज ठाकरे यांनी स्वतःकडे वेधून घेतले असताना राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष होते. यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेतला होता .

आपल्या भाषणात त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार नास्तिक असल्याचा आपला दावा पुढे नेला. शरद पवार नास्तिक आहेत ( Sharad Pawar is an atheist ) असं मी म्हटलो तर ते त्यांना लागलं. मला जे माहिती ते मी सांगितलं. मग फोटो यायला लागले. सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) संसदेत बोलल्यात की माझे वडील नास्तिक आहेत. जिकडे सभा घेतात तिकडे सांगतात राज ठाकरेंनी आजोबांची पुस्तकं वाचली पाहिजे. शरद पवारांनी जे हवं ते न वाचता सगळी पुस्तकं वाचा. मी सर्व वाचलंय. असं ते म्हणाले होते.

दरम्यान, आता यावर पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, दगडं आंब्याच्या झाडावर मारली जातात. बाभळीच्या झाडाला कोणी दगड मारतं का ? त्यामुळे लोकं उठसुट शरद पवारांवर जातीचे आरोप करतात.असं त्या म्हणाल्या.