‘बीड जिल्ह्यातल्या राजकारण्यांना लोक आपली जमीन दाखवायला घाबरतात’

बीड : महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय लढाई असणाऱ्या भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे या भावा-बहिणीच्या शाब्दिक चकमकी काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. मिळेल त्या ठिकाणी हे दोनही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता परळीत एका कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांना चांगलंच फैलावर घेतलं आहे.

‘मी कोणालाही प्लॉट किंवा जमीन मागत नसून आम्हाला लोक जमीन दाखवायला घाबरत नाहीत असे राजकारणी आम्ही आहोत. नाहीतर बीड जिल्ह्यातल्या राजकारण्यांना लोक आपली जमीन दाखवायला घाबरतात’, अशी टीका पंकजा मुंडे यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर केली. बीड शहरातील अंकुशनगर भागात भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने प्रवेशद्वार उभारण्यात आले. या प्रवेशद्वाराचे अनावरण आज पंकजा मुंडे यांनी केले. यावेळी त्या बोलत होत्या

तर, मी स्वतःसाठी लकी आहे की नाही माहीत नाही. पण मी नक्कीच दुसऱ्यांसाठी लकी आहे. मी ज्यांचा प्रचार करते त्यांचा उमेदवार निवडून येतो, असं लोक म्हणतात. माझा आणि माझ्या कार्यकर्त्यांचा कोणालाही त्रास होत नाही. असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.