बाळासाहेबांना मानणारी जनता शिंदे गटाला कधीही माफ करणार नाही – राष्ट्रवादी कॉंग्रेस

मुंबई – निवडणूक आयोगानं शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर, आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षाला शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena-Uddhav Balasaheb Thackeray), असं नाव, तसंच मशाल हे निवडणूक चिन्ह दिलं आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या पक्षाला बाळासाहेबांची शिवसेना (Shiv Sena of Balasaheb) हे नाव मिळालं आहे. मात्र, निवडणूक चिन्हासाठी त्यांनी दिलेले तिन्ही पर्याय निवडणूक आयोगानं फेटाळले असून, त्यांना नव्यानं तीन पर्याय द्यायला सांगितलं आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्ट्रो यांनी भाष्य केले असून शिंदे गटाला लक्ष्य केले आहे. ते म्हणतात, ज्यांनी बाळासाहेबांची शिवसेना तोडली, नाव आणि चिन्ह गोठवले, त्यांना ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव दिलं गेलंय. आदरणीय बाळासाहेब यांना मानणारी महाराष्ट्राची जनता हे कधीही स्वीकारणार नाही आणि यांना माफदेखील करणार नाही. येणार्‍या निवडणुकीत जनता या गटाला व भाजपला धडा नक्की शिकवणार.असं त्यांनी म्हटले आहे.