Ajit Pawar | रत्नागिरीत लोकनेते शामराव पेजे यांचे स्मारक उभारणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

Ajit Pawar | रत्नागिरीत लोकनेते शामराव पेजे यांचे स्मारक उभारणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

Ajit Pawar  | कोकणच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देणारे कोकणपूत्र, लोकनेते स्वर्गीय शामराव पेजे यांचे स्मारक रत्नागिरीतील कुवारबाव येथे उभारण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. स्मारकासाठी जमिनी उपलब्ध करण्यासह आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) यांनी बैठकीत दिले.

दरम्यान लोकनेते शामराव पेजे यांचे स्मारक भव्य आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे झाले पाहिजे, त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

रत्नागिरी जिल्ह्यातील विकासकामांच्या आढावा घेण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, मत्स्यव्यवसाय विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, गृह (परिवहन व बंदरे) विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे) संजय दशपुते, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन शर्मा आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह रत्नागिरीतील संबंधित संस्थांचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

कोकणच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या लोकनेते स्वर्गीय शामराव पेजे यांचे स्मारक कुवारबांव येथे व्हावे ही रत्नागिरीकरांची आणि राज्यशासनाची इच्छा आहे. त्यादृष्टीने स्मारकासाठी आवश्यक जागा संबंधित विभागाने तातडीने हस्तांतरीत करावी, स्मारकासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. स्मारकाचे काम दर्जेदार आणि लोकनेत्यास साजेसे असले पाहिजे, अशा सूचनाही अजित पवार यांनी दिल्या.

कोकणला लाभलेल्या सागरी किनाऱ्याचे महत्व लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यात सागरी विद्यापीठाची स्थापन करण्यास बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली. हे सागरी विद्यापीठ मेर्वी येथे समुद्रकिनारी उभारण्यात येणार आहे. विद्यापीठासाठी आवश्यक निधी उपलब्ध केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. शिवाय रत्नागिरी येथे शासकीय विधी महाविद्यालय उभारण्यासह जिल्ह्यातील अन्य प्रकल्प आणि विकासकामांचा सविस्तर आढावाही बैठकीत घेण्यात आला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Chakan traffic jam | चाकण परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून उपाययोजनांचा आढावा

Chakan traffic jam | चाकण परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून उपाययोजनांचा आढावा

Next Post
Champions Trophy 2025 | 'हिंमत असेल तर पाकिस्तानमध्ये येऊन खेळून दाखवा', पाक क्रिकेटरने टीम इंडियाला आव्हान दिले

Champions Trophy 2025 | ‘हिंमत असेल तर पाकिस्तानमध्ये येऊन खेळून दाखवा’, पाक क्रिकेटरने टीम इंडियाला आव्हान दिले

Related Posts
amol mitkari

मोहित कंबोज हा कोणाच्या चड्डीचा नाडा आहे, हे सगळ्यांना माहीत आहे – मिटकरी 

मुंबई – भारतीय जनता पार्टीचे (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी खळबळजनक ट्वीट्स केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस…
Read More
Eknath Shinde | बालहट्ट आणि अहंकारामुळे मविआ सरकारमध्ये राज्याचे नुकसान, शिंदेंचा घणाघाती आरोप

Eknath Shinde | बालहट्ट आणि अहंकारामुळे मविआ सरकारमध्ये राज्याचे नुकसान, शिंदेंचा घणाघाती आरोप

Eknath Shinde | भाजपला घाबरवून २० ते २५ आमदार फोडायचे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या…
Read More
पुण्यातील तीन माजी नगरसेवकांची शिवसेनेतून हकालपट्टी

पुण्यातील तीन माजी नगरसेवकांची शिवसेनेतून हकालपट्टी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने ( ShivSena UBT Group) पुण्यातील तीन माजी नगरसेवकांना पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षप्रमुख…
Read More