पेट्रोल-डीझेल राज्यात स्वस्त होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

मुंबई : पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय नव्याने सत्तेत आलेले शिंदे-फडणवीस सरकार घेणार असल्याची मोठी घोषणा नवनिर्वाचित मुख्यमंत्री (CM)एकनाथ शिंदे यांनी केली. बहुमत चाचणीत शिंदे सरकार उत्तीर्ण झाल्यानंतर अभिनंदन प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी उत्तर दिलं. केंद्रानंतर काही राज्यांनी व्हॅट कमी केला होता, पण महाराष्ट्राने केला नव्हता. आता नवं सरकार लवकारत लवकर तो निर्णय घेईल, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

दरम्यान, यापूर्वी केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलवरील (Petrol-Diesel)कर कपात करून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर अनेक राज्यांनी पेट्रोल डिझेलवरील कर कमी केले होते. परंतु महाराष्ट्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील आपले कर कमी केले नव्हते. त्यामुळे राज्यातील पेट्रोल डिझेलचे दर अधिकच होते.

दरम्यान, आता महाराष्ट्रातील सरकारनं पेट्रोल डिझेलवर लवकरच कर कपात करणार असल्याची माहिती दिली. लवकरच यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात येणार असून राज्यातील जनतेला दिलासा देणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.