संजय राऊत आणि रवी राणांचा एकत्र जेवतानाचा फोटो व्हायरल

नवी दिल्ली- राजकारणात कधी काय होईल यांचा नेम नसतो असं म्हटले जाते. त्याच प्रमाणे राजकारणात कुणीही शत्रू किंवा मित्र देखील नसतं असं देखील म्हटलं जातं. याचाच प्रत्यय आता आला आहे. कारण  शिवसेनेलाच (Shiv Sena) शिंगावर घेणाऱ्या राणा दाम्पत्यासोबत शिवसेना खासदार संजय राऊत यांचे फोटो व्हायरल झाले आहेत (Sanjay Rauts photo with Rana Couple Viral). लेह येथे खासदारांची बैठक होत आहे त्या बैठकीसाठी खासदार नवनीत राणा (Navnit Rana)देखील आल्या आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे संपूर्ण कुटुंब देखील आहे.

आमदार रवी राणा आणि संजय राऊत यांचा एकत्र जेवण करतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी गेल्या काही दिवसांपासून हनुमान चालिसेवरुन (Hnuman Chalisa)अख्खे राज्य डोक्यावर घेतले होते. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackrey) घरासमोर हनुमान चालिसेचे वाचन करणार असे रवी राणा- नवनीत राणा यांनी म्हटले होते. त्यानंतर राज्यात बराच गदारोळ झाला होता. मात्र आता या सर्वांचे एकत्र फोटो व्हायरल झाल्याने कार्यकर्ते मात्र तोंडघशी पडले आहेत.