Mahesh Landge | जाधववाडी-चिखलीत साकारणार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय! महेश लांडगेंच्या पाठपुराव्याला यश

Mahesh Landge | जाधववाडी-चिखलीत साकारणार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय! महेश लांडगेंच्या पाठपुराव्याला यश

Mahesh Landge | पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय उभारण्यासाठी जागा निश्चितीचा बहुप्रतिक्षीत निर्णय अखेर झाला. जाधववाडी-चिखली येथील गट. नं. ५३९ मधील ३ हे. ३९ आर. शासकीय जमीन पोलीस आयुक्तालय कार्यालय, निवासस्थान आणि परेड ग्राऊंड प्रयोजनाकरिता प्रदान करण्यासाठी राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने मान्यता दिली.

मुंबई येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पोलीस आयुक्तालय, चिखली पोलीस स्टेशनसाठी जागा व दापोडी पोलीस स्टेशनची निर्मिती याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि संबंधित विषय मार्गी लावण्याबाबत आग्रही मागणी केली होती.

आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) म्हणाले की, पिंपरी-चिंचवड स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्मितीचा लढा आपण यशस्वी केला. दि. १५ ऑगस्ट २०१८ रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते आयुक्तालयाचे कामकाज सुरू झाले. पण, आयुक्तालयासाठी स्वतंत्र- हक्काची इमारत नव्हती. त्यासाठी राज्य सरकार आणि संबंधित विभागांकडून सातत्त्याने पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले.

भोसरी विधानसभा मतदार संघातील जाधववाडी, चिखली येथील गट नंबर ५३९ पै. मधील ३ हे.३९ आर. जागेत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची भव्य वास्तू उभारण्याचा मार्ग मोकळा झाला. याठिकाणी पोलीस अधिकारी निवासस्थान व परेड ग्राऊंड होणार आहे. तसेच, चिखली पोलीस स्टेशनच्या इमारतीसाठी ९ गुंठे जागा निश्चित केली आहे. त्यामुळे आयुक्तालय, चिखली पोलीस स्टेशनच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे, असेही आमदार लांडगे म्हणाले.

पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड, पुणे सदर शासकीय जमिनीचा वापर केवळ मंजूर प्रयोजनासाठी करील. तसेच, जमिनीचा ताबा मिळाल्यापासून ३ वर्षांच्या आत मंजूर प्रयोजनासाठी वापर सुरू करणे बंधनकारक राहील, अशा अटींवर या जागेला मान्यता देण्यात आली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Pune News | काँग्रेसलाही पटलं 'लाडक्या बहिणी'चं महत्त्व! धंगेकरांकडून लाडक्या बहिणी योजनेची पोस्टरबाजी

Pune News | काँग्रेसलाही पटलं ‘लाडक्या बहिणी’चं महत्त्व! धंगेकरांकडून लाडक्या बहिणी योजनेची पोस्टरबाजी

Next Post
Gautam Gambhir | बीएमडब्ल्यू, ऑडीने फिरतो, दिल्लीत 15 कोटींचे घर; नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आहे कोट्यवधींचा मालक

Gautam Gambhir | बीएमडब्ल्यू, ऑडीने फिरतो, दिल्लीत 15 कोटींचे घर; नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आहे कोट्यवधींचा मालक

Related Posts
"कसबा मतदारसंघातील बांधकामांना युडीसीपीआर कायद्यात शिथिलता आणि शनिवारवाडा परिसरातील बांधकामांना परवानगी द्या"

“कसबा मतदारसंघातील बांधकामांना युडीसीपीआर कायद्यात शिथिलता आणि शनिवारवाडा परिसरातील बांधकामांना परवानगी द्या”

पुणे – गावठाण भागातील अनेक वाडे आणि जुन्या सोसायट्यांचा विकास होणे अत्यंत गरजेचे असून युडीसीपीआर नियमावलीमुळे अनेक अडचणींचा…
Read More
Uddhav Thackeray

शिवसेना समर्थक आमदारांना राष्ट्रवादी-काँग्रेसकडून फोन; मुख्यमंत्री भडकले

मुंबई – विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Election) १० जागांसाठी येत्या २० तारखेला मतदान होणार आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये…
Read More

मोबाइल घ्यायच्या विचारात आहात का ? मग ही आहे सुवर्णसंधी

ई कॉमर्समधील आघाडीची वेबसाईट अॅमेझोनने भारतात मोबाइल आणि टीव्हीवर सेव्हीगं डे सेलची घोषणा केली आहे.अमेझोनने यामध्ये अनेक स्मार्ट…
Read More