येत्या ३ डिसेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार ‘पिरेम’!

पुणे – गेल्या दीडेक वर्षांपासून कोरोना महामारीमुळे निष्प्रभ झालेली चित्रपटसृष्टी पुन्हा उभारी घेऊ पाहतेय. लॉकडाऊन मध्ये आणि नंतरही बंद ठेवण्यात आलेली सिनेमागृहे आता सुरु झाली असून हिंदी सोबत मराठी चित्रपटही प्रदर्शनासाठी तयारी करताहेत. पर्व फिल्म्स निर्मित ‘पिरेम’ (Pirem)हा मराठी सिनेमादेखील येत्या ३ डिसेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

‘पिरेम’ ह्या नावावरून कल्पना आलीच असेल की कथा ग्रामीण भागातील आहे. ही कहाणी एका गावातील गरीब घरातील अत्यंत हुशार मुलाची आहे, जो गावात उच्च शिक्षणाची सोय नसल्यामुळे दहावीनंतर शहरातील कॉलेजात शिकायला जातो. तिथे त्याच्या आयुष्यात प्रेमांकुर फुलतो परंतु तो एका विचित्र प्रसंगात गुरफटून जातो. पर्व फिल्म्स निर्मित ‘पिरेम’ या चित्रपटातून विश्वजीत पाटील आणि दिव्या सुभाष ही एक नवीनतम जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यांच्यासोबत मानिनी दुर्गे, विठ्ठल खलसे, सागर खुर्द यांसारखी तगडी कलाकार मंडळी सोबतीला आहेत.

जगात कुठेही गेलात तरी प्रेम ही भावना सारखीच दिसून येईल. जात, भाषा, वर्ण, धर्म, गरीब, श्रीमंत, शहर वा गाव अशा कुठल्याही गोष्टी प्रेमामध्ये अडसर ठरत नाहीत. खऱ्या प्रेमामध्ये स्वार्थाला तसूभरही जागा नसते व दोन्ही व्यक्ती समोरच्याला अधिकाधिक आनंद मिळावा यासाठी प्रयत्शील असतात. प्रदीप लायकर दिग्दर्शित ‘पिरेम’ या मराठी चित्रपटात याच भावनेला अतिशय वेगळ्या ढंगाने पेश केलं आहे.

एक निस्वार्थी ग्रामीण प्रेमकथा असलेला चित्रपट ‘पिरेम’ ३ डिसेंबर २०२१ ला संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

पुण्यातील ‘माण-हिंजवडी ते शिवाजीनगर’ मेट्रो मार्गिका-३ च्या कामाला सुरुवात

Next Post

मुंबई, औरंगाबाद आणि बार्शी (जि.सोलापूर) येथील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी केला राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश…

Related Posts
'हिंदूव्यतिरिक्त कुणासोबतही व्यवहार नको' म्हणणाऱ्या नितेश राणेंना अजित पवारांनी झापलं, म्हणाले... | Ajit Pawar

‘हिंदूव्यतिरिक्त कुणासोबतही व्यवहार नको’ म्हणणाऱ्या नितेश राणेंना अजित पवारांनी झापलं, म्हणाले… | Ajit Pawar

Ajit Pawar| भाजप आमदार नितेश राणे हे सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करत असतात. यावरुन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…
Read More
अनुराग कश्यप यांचा मुंबई सोडण्याचा निर्णय, बॉलिवूडवर नाराजी केली व्यक्त

अनुराग कश्यप यांचा मुंबई सोडण्याचा निर्णय, बॉलिवूडवर नाराजी केली व्यक्त

प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप  ( Anurag Kashyap) यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली…
Read More

जेवणात मासे न बनवल्याने जावयाची पत्नीला मारहाण, चिडलेल्या सासरा-मेहुण्याने केला दुर्देवी अंत

Bihar Crime News: बिहारच्या भोजपूरमध्ये पत्नीला मारहाण करणं जावईला महागात पडलं. मुलीला मारहाण केल्याने संतापलेल्या सासऱ्याने आणि भावाने…
Read More