सातवीत पियुष मिश्रा यांचं महिला नातेवाईकानं केलेलं लैंगिक शोषण; अभिनेते म्हणाले, सेक्स…

नवी दिल्ली- बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते पियुष मिश्रा (Piyush Mishra) गेल्या जवळपास 35 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असून या अभिनेत्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेमही मिळत आहे. त्याचवेळी पियुष यांनी त्यांच्या आयुष्याशी निगडित असे एक सत्य उघड केले आहे, जे ऐकून त्याच्या प्रियजनांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सुमारे 50 वर्षांपूर्वी पियुष यांच्यावर एका दूरच्या महिला नातेवाईकाने लैंगिक अत्याचार  (Sexual Harassment) केले होते.

‘तुम्हारी औकात क्या है पीयूष मिश्रा’ या आत्मचरित्रात या घटनेचा खुलासा करताना पियुष मिश्रा यांनी या घटनेने त्यांना आयुष्यभर वेदना दिल्याचे सांगितले आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकात त्यांनी केवळ नावे बदलून सत्य नेमकेपणाने मांडल्याचे त्यांनी सांगितले आहे. मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार सूड घेण्याचा त्यांचा हेतू नसल्यामुळे त्यांनी नावे बदलली आहेत.

त्यांनी पीटीआयला सांगितले की, लैंगिक छळाच्या घटनेने त्यांना हादरवून सोडले आणि जे घडले ते पाहून त्यांना धक्का बसला होता. पियुष मिश्रा सातवीत शिकत असताना ही घटना घडली होती. मिश्रा म्हणाले, ‘सेक्स ही खूप आरोग्यदायी गोष्ट आहे आणि त्याचा पहिला अनुभव चांगला असायला हवा, अन्यथा तो तुम्हाला आयुष्यभर त्रास देतो. लैंगिक छळामुळे मी बराच काळ निराश होतो आणि त्यातून सावरण्यासाठी मला बराच वेळ लागला.’

ग्वाल्हेरच्या अरुंद रस्त्यांपासून ते दिल्लीतील मंडी हाऊसच्या सांस्कृतिक केंद्रापर्यंत आणि शेवटी मुंबईत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास या पुस्तकात आहे. प्रसिद्ध अभिनेते, गायक आणि संगीतकार पियुष म्हणाले, ‘मला काही लोकांची ओळख लपवायची होती. त्यापैकी काही महिला आहेत तर काही पुरुष आहेत ज्यांना आता चित्रपटसृष्टीत चांगले स्थान मिळाले आहे. मला कोणावरही सूड घ्यायचा नाही.’

पुस्तकानुसार, पियुष यांच्या वडिलांनी त्याच्यावर वैद्यकीय शास्त्रात करिअर करण्यासाठी दबाव आणल्यानंतर, मिश्रा यांनी शिक्षण सोडले आणि वयाच्या 20 व्या वर्षी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला ते दिल्ली सोडण्यास तयार नव्हता. त्यांचे मित्र करिअर करण्यासाठी मुंबईत आले होते. मात्र, पियुष 2000 च्या सुरुवातीला मुंबईत आले. त्यानंतर विशाल भारद्वाजच्या ‘मकबूल’ (2004), अनुराग कश्यपच्या ‘गुलाल’ (2009) आणि 2012 च्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटांसह त्याने अभिनेता, गीतकार, गायक आणि पटकथा लेखक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली.