MIM च्या मोर्चामध्ये औरंगजेबाचे फोटो लावणे म्हणजे, औरंग्याच उदात्तीकरण करण्यासारखं आहे – लाड

छत्रपती संभाजीनगर :  नामांतराच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. यावेळी एमआयएमचे (MIM) खासदार यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली. मात्र यावेळी या उपोषणस्थळी चक्क औरंगजेबाचे (Aurangzeb) होर्डिंग झळकवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

औरंगाबादच्या नामांतराला विरोध करत इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) उपोषणाला बसले आहे. पण उपोषणस्थळी जलील समर्थकांनी औरंगजेबच्या नावाने घोषणाबाजी करत फोटो झळकावला आहे. ‘जब तक सुरज चाँद रहेंगा, औरंगजेब तेरा नाम रहेंगा’ अशा घोषणाच या समर्थकांनी दिल्या. औरंगजेबाच्या घोषणाबाजी केल्यामुळे वाद पेटण्याची चिन्ह आहे.

दरम्यान, या मुद्द्यावरून भाजप (BJP) आमदार प्रसाद लाड (MLA Prasad Lad) यांनी टीकास्त्र सोडले आहे. संभाजीनगरमध्ये MIM च्या मोर्चामध्ये औरंगजेबाचे फोटो लावणे म्हणजे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नगरीत औरंग्याच उदात्तीकरण करण्यासारखं आहे. यावर जनाब उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काही बोलणार आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. हिंदुस्थानातली ही परिस्थिती हिंदू विरोधातली ही परिस्थिती याबाबत जनाब उद्धव ठाकरे बोलणार आहेत का? की याचे उत्तर आम्हालाच हिंदू (Hindu) म्हणून द्यावे लागेल असं ते म्हणाले आहेत.