PM Modi | हिंदू-मुस्लीम भेदभाव केला तर मी सार्वजनिक जीवनात राहण्याच्या पात्रतेचा उरणार नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी मंगळवारी काशी येथे सांगितले की, ज्या दिवशी मी हिंदू आणि मुस्लिम असा भेद करेन, त्या दिवशी मी सार्वजनिक जीवनात राहू शकणार नाही. मी हिंदू-मुस्लिम कधीच करणार नाही, हा माझा संकल्प आहे. सरकारी योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना लाभ देताना मी जात-धर्माचा विचार करत नाही, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

गंगा पूजेनंतर पंतप्रधान मोदींनी (PM Modi) वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांना असा प्रश्न विचारण्यात आला की, जेव्हा तुम्ही मंचावर मुस्लिमांचा उल्लेख केला तेव्हा तुम्ही त्यांना घुसखोर आणि जास्त मुले निर्माण करणारे संबोधले. याची काय गरज होती?

यावर पंतप्रधान म्हणाले की, मला आश्चर्य वाटते की ते मुस्लिमांशी जोडले जात आहे. तर याआधी आपण ना हिंदू म्हणतो ना मुस्लिम. ज्या समाजात जास्त गरिबी असते, तिथे मुले जास्त असतात. आम्हाला एवढेच सांगायचे आहे की तुम्हाला जेवढी मुले सहज वाढवता येतील तेवढीच मुले असावीत.

दुसऱ्या एका प्रश्नाच्या उत्तरात पंतप्रधान म्हणाले की, राम मंदिर हा पूर्वीच्या निवडणुकीत मुद्दा नव्हता, आजही नाही आणि भविष्यातही असणार नाही. राम मंदिर हा श्रद्धेचा मुद्दा आहे. राम मंदिराचे निमंत्रण नाकारणाऱ्यांना आता हे पाप आपल्याला मारून टाकेल अशी भीती आहे. त्यामुळे ते खूप चिंतेत आहे, असा निशाणा मोदींनी काँग्रेसचे नाव न घेता मारला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप