PM Modi | “जिथे होर्डिंग कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला तेथे पंतप्रधान रोड शो करतात यासारखी अमानुष गोष्ट नाही”

PM Modi | घाटकोपर येथील होर्डिंग कोसळून झालेल्या अपघाताची भरपूर चर्चा सुरू असतानाच बुधवारी संध्याकाळी घाटकोपरमध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा एक रोड शो झाला. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ हा रोड शो आयोजित केला गेला होता. या मुद्द्यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीकास्त्र सोडले.

“देशाच्या पांतप्रनांच्या (PM Modi) रोड शो साठी दुपारी १२ पासून मुंबईचे रस्ते, मेट्रो, कार्यालये बंद केली. लोकांचे हाल झाले. निवडणूक आयोग आहे कुठे? आचारसंहिता आहे कुठे? अशा प्रकारचा प्रचार या देशात कधीही झाला नव्हता. एका व्यक्तीने प्रचाराला यावं आणि त्याचा प्रचार सुरळीत व्हावा म्हणून रस्ते बंद करण्यात आले, लोकांची गैरसोय करण्यात आली. जिथे होर्डिंग कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला तेथे पंतप्रधान रोड शो करतात यासारखी अमानुष गोष्ट नाही,” असे राऊत म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप