Murlidhar Mohol : नगरसेवक, महापौर ते थेट केंद्रात मंत्री! मुरलीधर मोहोळांना लॉटरी!

Murlidhar Mohol: नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) शपथविधीपूर्वी एनडीएच्या मित्रपक्षांच्या खासदारांना मंत्री बनवण्याचे फोन येऊ लागले आहेत. टीडीपी आणि जेडीयूसारख्या पक्षांच्या खासदारांना फोन आले आहेत. दरम्यान पुण्याचे नवनिर्वाचीत खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनाही शपथविधीसाठी फोन आला असल्याचे समजत आहे. त्यामुळे आता मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात कोणते मंत्रीपद मिळेल? याची उत्सुकता वाढली आहे.

वास्तविक, नवीन सरकारमध्ये एनडीएच्या विविध घटकांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यासाठी भाजप आणि मित्रपक्षांमध्ये चर्चा झाली आहे. अमित शहा आणि राजनाथ सिंह यांच्याशिवाय, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू, जेडीयू प्रमुख नितीश कुमार आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांसारख्या नेत्यांसोबत मंत्रिमंडळात सामायिक करण्याबद्दल बोलले आहेत. त्यानंतरच नावे फायनल झाली असून आता कॉल्स येऊ लागले आहेत. या लोकांना आजच शपथही घेता येईल.

यादरम्यान महाराष्ट्रातून मुरलीधर मोहोळ यांना मंत्रीपदासाठी फोन आला आहे. मुरलीधर मोहोळ यांना नगरसेवक, महापौर ते आता थेट केंद्रात मंत्रीपद मिळणार आहे. त्यांच्याबरोबरच महाराष्ट्रातून भाजपाच्या प्रतापराव जाधव, पियुष गोयल आणि नितीन गडकरी यांनाही मंत्रीपद मिळू शकते. तसेच रामदास आठवले यांनाही मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फोन गेला नसल्याचे समजत आहे.

महत्वाच्या बातम्या-

Naseem Khan : महाराष्ट्रात मराठा, मुस्लिम व धनगर समाजाला त्वरित आरक्षण द्या – नसीम खान

Shrikant Shinde : श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद द्या, शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली इच्छा

“अयोध्येतील भव्य मंदिरासोबतच आसपासच्या शहरवासीयांचे…”, भाजपच्या पराभवावर ‘शक्तिमान’ची लक्षवेधी प्रतिक्रिया

You May Also Like