प्रवीण नेत्तर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली

बेल्लारी – दक्षिण कन्नडमधील भाजपच्या युवा मोर्चा समितीचे सदस्य प्रवीण नेत्तर (BJP Yuva Morcha Committee Member Praveen Nettaru) यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली. दोन संशयित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संस्थेचे सदस्य आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी बेल्लारी पोलिसांनी (Bellary Police) पथके तयार करून शोधमोहीम सुरू केली होती.

जिल्हा भाजप युवा मोर्चा समितीचे सदस्य प्रवीण नेत्तर यांची बेल्लारी येथील त्यांच्या दुकानासमोर मंगळवारी रात्री दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी धारदार शस्त्रांनी वार करून हत्या (murder) केली. ते दुकान बंद करून घरी जात असताना त्यांची हत्या करण्यात आली. हत्येनंतर बुधवारी दक्षिण कन्नड जिल्ह्यात अनेक ठिकाणी तणाव निर्माण झाला. आंदोलकांनी दगडफेक केली आणि पोलिसांनी लाठीमार केल्याच्या घटना घडल्या.