नवी मुंबई | विधानसभेच्या तिकिटावरून भाजपवर नाराज होत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये प्रवेश केलेले संदीप नाईक ( Sandeep Naik) समर्थक २८ नगरसेवक पुन्हा भाजपमध्ये परतले आहेत. “आम्ही भाजपाचे काम करून नवी मुंबई महानगरपालिकेवर भाजपाची सत्ता आणणार आहोत,” असे परतलेल्या नगरसेवकांनी स्पष्ट केले आहे.
विधानसभा निवडणुकीत संदीप नाईक यांना भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र, त्यांची नाराजी भाजप पक्षावर नसून स्थानिक नेतृत्वावर, विशेषतः मंदा म्हात्रे यांच्यावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संदीप नाईक ( Sandeep Naik) यांच्या भाजपमध्ये पुनरागमनाबाबत विचारले असता, “याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील,” असे सांगण्यात आले. यामुळे नवी मुंबईच्या राजकारणात पुढील काही दिवसांत नवे समीकरण दिसण्याची शक्यता आहे.
या घडामोडींमुळे नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये हालचालींना वेग आला आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाबद्दल माफी तर भाजपानेच मागावी | Atul Londhe
“बालकांचे संरक्षण आणि शिक्षणाची गुणवत्ता हा आमचा प्राधान्यक्रम” – Dada Bhuse