युतीचे सरकार येताच मोर्चे निघतात कसे? यामागचा बोलविता अन करविता धनी कोण?; प्रवीण अलई यांचे थेट खटक्यावर बोट

Mumbai –  विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढलाय. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आणि समविचारी संघटनांच्या वतीने काढण्यात आला आहे. यावर आज शेतकरी प्रतिनिधी आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यात दुपारी तीन वाजता बैठक होणार होती.. मात्र ही बैठक आता उद्या दुपारी होणार आहे.

दरम्यान, एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे सरकार असताना एकही मोर्चा न काढणारे शेतकरी शिंदे फडणवीस सरकार येताच मोर्चे का काढू लागले आहेत असा सवाल उपस्थित होत आहे. यामागे नेमकं कोण आहे असा देखील सवाल उपस्थित होत आहे. तशा पद्धतीचे अनेकांनी सवाल देखील उपस्थित केले आहेत. याबाबत भाजपनेते प्रवीण अलई (Pravin Alai)  यांनी ट्वीट करत थेट खटक्यावर बोट ठेवले आहे.

ते म्हणाले, जनतेला विचलित करणारी स्थिति..राज्यात राष्ट्रवादी-कॉंग्रेस आणि महाविकासआघाडी ची सरकारे होती,त्यावेळी सर्व काही अलबेल व समृद्ध होते का?शेतमालाला अतिरिक्त भाव होता का? यामागचा बोलविता अन करविता धनी कोण? शेतकरी राजा कर्ज मुक्त झाला होता का? पाण्याचे प्रश्न संपुष्टात आले होते का? नाही तर…. मग भाजपा- युतीचे सरकार येताच मोर्चे निघतात कसे? यामागचा बोलविता अन करविता धनी कोण?? विचारतोय महाराष्ट्र… असं त्यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे.

 शेतकरी मोर्चाबाबत प्रश्न उपस्थित करणारे इतर काही ट्वीटस