पूजा सावंतचे नवे पाऊल, लवकरच दिसणार हिंदी गाण्यात

मराठी चेहरे जगभरात पोहोचवण्याचा ‘सुमन एंटरटेनमेंट’ चा नेहमीच प्रयत्न असतो. ’सुमन एंटरटेनमेंट’ने मराठी भाषेत अनेक दर्जेदार गाण्यांची निर्मिती केली आहे. असून त्यांच्या प्रत्येक गाण्याला संगीतरसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.

‘सुमन एंटरटेनमेंट’ने निर्मित केलेले प्रत्येक गाणे श्रवणीय असून त्यातील दृश्येही विलोभनीय आणि नजर खिळवून ठेवणारी असतात.अशा दर्जेदार गाण्यांची निर्मिती करणारे ‘सुमन एंटरटेनमेंट’ आता हिंदीत पदार्पण करत आहे. मराठी प्रमाणेच हिंदीतही दर्जेदार गाण्यांची निर्मिती करण्याचा ‘सुमन एंटरटेनमेंट’चे सर्वेसर्वा केदार जोशी यांचा मानस आहे. त्यांच्या पहिल्या हिंदी गाण्यात मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत दिसणार आहे.

‘सुमन एंटरटेनमेंट’ची या पुढील गाणी जरी हिंदी असली तरी या गाण्यांसाठी प्राधान्य मराठी कलाकारांना देऊन, हे चेहरे जगभरात पोहोचवण्याचा या निर्मिती संस्थेचा प्रयत्न आहे. तसेच लवकरच पंजाबी आणि गुजराती भाषांमध्ये देखील ‘सुमन एंटरटेनमेंट’ची उत्तम गाणी प्रेक्षकांना पाहायला आणि ऐकायला मिळणार आहेत.

https://youtu.be/3AmlxDP4tcU

You May Also Like