करमाळा : करमाळ्यावरून पारेवाडी रेल्वेस्थानकाकडे जाताना दिवे गव्हाण गावाच्या पुढे रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. दिवेगव्हाणपासुन सुमारे सहा किलोमीटरचा रस्त्यामध्ये खड्डे आढळलेले दिसतात. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना प्रवास करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या मार्गावर करमाळा, कोर्टी, राजुरी,दिवेगव्हाण,पारेवाडी,सावडी या गावातील नागरिक प्रवास करतात.सध्या ऊसाचा हंगाम तेजीत चालू आहे ऊस वाहतूक ट्रॅक्टरची वाहतूक होताना दिसते. पाचशे मीटरचा सलग असा चांगला रस्ताही या मार्गावर सापडणार नाही.पावसाळ्यात तर रस्त्या आणखी घसरडा होतो. उस वाहतूक ट्रॅक्टरची वाहतूक असल्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून दुचाकी चालवावी लागते.
दुचाकी घसरून या रस्त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.याठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण लवकरात लवकर झाले तर होणाऱ्या घटना टाळता येतील आणि दुचाकी वाहनचालकांचा ,उस वाहतुकदारांचा प्रवास व्यवस्थित होईल.लवकरात लवकर हा रस्ता डांबरीकरण करावा अशी मागणी होत आहे.
https://www.youtube.com/watch?v=Z4Y6-snAmEc&t=103s