नागपुरात डान्स हंगामाच्या नावावर अश्लील नृत्य, व्हिडियो व्हायरल

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील बाम्हणी या गावामध्ये नुकताच एक डान्स हंगाम कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात डान्स हंगामाच्या नावावर अश्लीतेचा कळस गाठण्यात आला होता. डान्स हंगामाच्या नावावर इथल्या कलाकारांनी अश्लील नृत्य केले. या अश्लील नृत्याचा व्हिडिओ नागपूर जिल्ह्यात वेगाने व्हायरल होत आहे.

हा प्रकार ज्या ठिकाणी सुरु होता त्याठिकाणी मुले-मुली अर्धनग्न होऊन अश्लील नृत्य करत आहेत. रात्रीच्या वेळी अश्‍लील डान्स पाहण्यासाठी तरुणांची खूप गर्दी दिसून येत आहे, सर्वात गंभीर बाब म्हणजे अश्लील डान्सची पोलिसांना माहिती नाही, स्थानिक पातळीवर तरुणांना आकर्षित करण्यासाठी जाहिराती देऊन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे देखील समोर आले आहे.

रात्रीच्या अंधारात बंद शामियानामध्ये सुरु असलेल्या नृत्याचा कोणीतरी त्याचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे नागपुरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, कलम 144 लागू आहे, असे असतानाही हा डान्स सार्वजनिक ठिकाणी होतोय, पोलिसांना कसे लाकले नाही हा चर्चेचा विषय बनला आहे.