Porsche car accident | porsche कारने दोघांना चिरडले आणि आरोपीला शिक्षा काय, ३०० शब्दांचा निबंध

शनिवारी रात्री उशिरा घडलेल्या अपघातात (Porsche car accident) एका तरुण आणि तरुणीला आपला जीव गमवावा लागला. पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिकाचा मुलगा वेदांत अग्रवाल पोर्श कार चालवत असताना त्याने दुचाकीस्वाराला धडक दिली ज्यात तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला. कल्याणी नगरमध्ये पहाटे 3:15 च्या सुमारास हा अपघात झाला, तरुण आणि त्याची मैत्रिण एका पार्टीनंतर बल्लर पबमधून बाहेर पडत होते. यावेळी हा अपघात घडला. या अपघातानंतर (Porsche car accident) वेदांत अग्रवालला अटक करण्यात आली होती. तसेच त्याच्या वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मात्र अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीला जामीन देण्यात आला आहे. तसेच त्याला सुनावलेली शिक्षा अतिशय हास्यास्पद आहे.

काय आहे शिक्षा

दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या या मुलाला कोर्टाने ठोठावलेल्या शिक्षेची सध्या सर्वत्र चर्च सुरू आहे.

१) आरोपीला 15 दिवस येरवडा विभागातील पोलिसांसोबत ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी मदत करावी लागेल. तसेच वाहतूक जागृतीचे फलक रंगवावे लागतील

२) आरोपीला मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन उपचार घ्यावे लागतील.

३) भविष्यात आरोपीने कोणताही अपघात पाहिला तर त्याला सर्वप्रथम अपघात ग्रस्तांची मतद करावी लागेल.
४) रस्ते अपघाताचे परिणाम आणि त्यावरील उपाय या विष्यावर आरोपीला कमीत कमी 300 शब्दांचा निबंध लिहावा लागेल.

या अटींवर त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप