Porsche Taycan Price | पोर्श वाहनांची गणना लक्झरी कारमध्ये केली जाते. पोर्श कार तुम्हाला प्रवास करताना आराम देते. या कारचा नुकताच मोठा अपघात झाल्याने ही कार चर्चेत आली आहे. १८ मे रोजी रात्री पुण्यात हा अपघात झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या एका पोर्श कारने दोन दुचाकीस्वारांना धडक दिली. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला.
शहर डीसीपी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोर्श कार चालवणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपींवर योग्य ती कारवाई केली जाईल असेही सांगण्यात आले आहे. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये हा अपघात झाला.
Porsche Taycan सोबत मोठा अपघात झाला
कार चालक पोर्श टायकन २०० च्या सुसाट वेगाने चालवत होता, त्यामुळे दुचाकी समोरून आदळली. या धडकेमुळे दुचाकी चालकाचा तोल गेला आणि दुचाकीस्वार व त्याच्यासोबत असलेली तरुणी यांचे निधन झाले. याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे. ज्या आलिशान कारमुळे हा अपघात झाला त्याची किंमत काय आहे? ते जाणून घेऊया.
Porsche Taycan ची वैशिष्ट्ये
पोर्श टायकनमध्ये मॅट्रिक्स डिझाइन एलईडी हेडलाइट्स आहेत. तर टर्बो मॉडेल्समध्ये मानक एचडी-मॅट्रिक्स डिझाइन एलईडी हेडलाइट्स बसवण्यात आले आहेत. कारमध्ये 360-डिग्री व्ह्यू कॅमेराची सुविधा देखील आहे. पोर्शच्या कारमध्ये 10.9-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले आहे, जो नेव्हिगेशन सिस्टम आणि इन्फोटेनमेंट सिस्टम वैशिष्ट्ये प्रदान करतो.
पोर्श टायकनची पावर
पोर्श टायकन ही उत्तम वैशिष्ट्ये असलेली कार आहे. ही कार 300 kW किंवा 408 PS ची पॉवर जनरेट करते. पोर्श कारचा टॉप स्पीड 230 kmph आहे. तर ही कार 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडण्यासाठी 4.8 सेकंद घेते.
या वर्षी मार्चमध्ये पोर्श टायकनचे इलेक्ट्रिक व्हेरिएंट बाजारात दाखल झाले होते. Porsche Taycan Turbo GT ही एक शक्तिशाली आणि वेगवान कार आहे. ही कार केवळ 2.1 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडण्यास सक्षम आहे. जर्मन कार निर्मात्याचा दावा आहे की ही कार 305 किमी प्रतितास इतका वेग देते.
पोर्श टायकन किंमत
पोर्श कार लोकांना आलिशान अनुभव देतात. या कारच्या पॉवर आणि फीचर्समुळे या कारची किंमत करोडो रुपयांच्या घरात जाते. पोर्श टायकनची एक्स-शोरूम किंमत 1.61 कोटी रुपयांपासून सुरू होते आणि 2.44 कोटी रुपयांपर्यंत जाते.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप