डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त पुरस्कारार्थींच्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार – धनंजय मुंडे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त पुरस्कारार्थींच्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार - धनंजय मुंडे

मुंबई,दि.२८ ऑक्टोबर – डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त पुरस्कारार्थींना एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून मोफत प्रवास करण्याबाबतचा प्रस्ताव गृहविभागास लवकरच सादर करण्यात येईल तसेच पुरस्कारार्थींच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

मंत्रालयातील दालनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पूरस्कार मित्र राज्य संघाच्या विविध मागण्यासंदर्भात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

या बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे,राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या विभाग नियंत्रक यामिनी जोशी यासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पूरस्कार मित्र संघाचे राज्याध्यक्ष नरोत्तम चव्हाण, प्रभाकर फुलसुंदर,योगेश वागदे, विलास वंशिक,शंकर खुळे तसेच पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पूरस्कार प्राप्त पुरस्कारार्थींच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून पुरस्कारार्थींनी राज्य परिवहन महामंडळाच्या सर्वसाधारण, निमआराम व आराम गाडयातून तसेच भाडेतत्वावर असलेल्या बसेसमधून मोफत प्रवास देण्याबाबत गृह विभागाला दिवाळीच्या आधी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. तसेच मानधनाबाबतीत वित्त विभागाला माहिती सादर करून याबाबतीतही सकारात्मक निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी दिली.

https://www.youtube.com/watch?v=GmVj7hqrh5o

Previous Post
जाणून घ्या मानवी इतिहासातील सर्वात मोठा आवाज कधी ऐकू आला आणि त्याचा काय परिणाम झाला?

जाणून घ्या मानवी इतिहासातील सर्वात मोठा आवाज कधी ऐकू आला आणि त्याचा काय परिणाम झाला?

Next Post
'काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हर्बल तंबाखू खाऊन आरोप करतात का?'

‘काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हर्बल तंबाखू खाऊन आरोप करतात का?’

Related Posts
बाई काय हा प्रकार… तोच तो डर्टी पिक्चर किती वेळा बघायचा…?; रुपाली पाटील यांचा कुणाला टोला

बाई काय हा प्रकार… तोच तो डर्टी पिक्चर किती वेळा बघायचा…?; रुपाली पाटील यांचा कुणाला टोला

Rupali Thombre Patil | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने रुपाली चाकणकर यांची पुन्हा महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड केली…
Read More
Vodafone Idea

Vodafone Idea देखील कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत, जाणून घ्या किती लोक बेरोजगार होतील 

Vodafone Idea : आयटी (IT) आणि टेक (Tech) कंपन्यांनंतर आता दूरसंचार कंपन्यांकडूनही छाटणीची तयारी सुरू झाली आहे. आता व्होडाफोन (Vodafone)देखील…
Read More
Punit Balan | भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडकडून पुनीत बालन यांचा प्रशस्तीपत्रक देऊन गौरव

Punit Balan | भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडकडून पुनीत बालन यांचा प्रशस्तीपत्रक देऊन गौरव

पुणे | पुण्यातील युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर असलेले पुनीत बालन (Punit Balan) यांचा भारतीय संरक्षण…
Read More