Kasba Vidhansabha : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात हालचालींना वेग आला आहे. महायुतीत वरिष्ठ पातळीवर जागावाटपाचा तिढा सोडवण्याचं काम सुरू आहे. त्यातही पुण्यातील 8 मतदारसंघांपैकी जास्तीत जास्त मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यासाठी भाजप, अजित पवार पक्ष आणि मुख्यमंत्री शिंदे पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत. अशातच भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यातील कसबा मतदारसंघातून (Kasba Vidhansabha) निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांना पुन्हा संधी मिळणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तसेच शहराध्यक्ष धीरज घाटे यांचेदेखील नाव उमेदवारांच्या शर्यतीत आहे. असे असतानाच कसबा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांमध्ये पोस्टरवॉर रंगल्याचे दिसत आहे. हेमंत रासने आणि धीरज घाटे यांच्या समर्थकांकडून पोस्टर्स व्हायरल करण्यात आले आहेत.
माजी स्थायी समिती अध्यक्ष असणारे हेमंत रासने यांचा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांच्याकडून पराभव झाला होता. मात्र त्यानंतर देखील पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवत निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली. त्यांनी मतदारसंघांमध्ये नागरिकांच्या समस्या सोडवण्याच्या माध्यमातून आपला जनसंपर्क वाढवला आहे. कसब्यामध्ये पक्षीय संघटना मजबूत करण्यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभवाचा वचपा काढत भाजपने जवळपास 15 हजारांचे मताधिक्य मिळवले. आता काँग्रेसकडे गेलेला मतदार संघ पुन्हा मिळवण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
हेमंत रासने यांच्यासह शहराध्यक्ष धीरज घाटे हे देखील कसब्यातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. सोबतच दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक, दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट देखील इच्छुक आहेत. रासने आणि घाटे यांच्या समर्थकांकडून सध्या सोशल मीडियावर पोस्टर्स व्हायरल केली जात आहेत. यामध्ये आपला नेताच कसब्याचा आमदार होणार असा दावा करण्यात आला आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
पुण्याची वाहतूक कोंडी सोडविणे ही राज्य सरकारची जबाबदारी | CM Eknath Shinde
‘महाराष्ट्र विधानसभा २०२४ विजय संकल्प संमेलना’चे मुंबईत उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
उद्योगस्नेही धोरणामुळे परकीय गुंतवणूकीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर | Uday Samant