ठाकरे सरकारला न्यायालयाचा दणका; ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती

cm

नवी दिल्ली- राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधे ओबीसी अर्थात इतर मागासवर्गासाठी असलेल्या २७ टक्के आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. या आरक्षणासाठी राज्यशासनानं काढलेल्या अध्यादेशाला तसंच त्या अनुषंगानं राज्य निवडणूक आयोगानं काढलेल्या अधिसूचना आवाहन देणाऱ्या याचिकेवर न्यायमूर्ती अजय खानविलकर आणि न्यायमूर्ती सी. टी रवीकुमार यांच्या पीठानं आज हा आदेश दिला.

आयोग स्थापन करून स्थानिक स्वराज्य संस्थांमधे पुरेसं प्रतिनिधित्व नसल्याबाबत आकडेवारी गोळा केल्याशिवाय आणि २७ टक्के ओबीसी कोट्याची अंमलबजावणी शक्य नसल्याचं न्यायालयानं सांगितल. आयोगाद्वारे अशी आकडेवारी गोळा केल्याशिवाय राज्य निवडणूक आयोगालाही ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण देता येणार नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगानं याआधीच अधिसूचित केलेला निवडणूक कार्यक्रम चालू ठेवायलाही राज्य निवडणूक आयोगाला परवानगी देता येणार नाही, असं न्यायालयानं स्पष्ट केलं.

या प्रकरणी पुढच्या आदेशापर्यंत कोणत्याही मध्यावधी किंवा सार्वत्रिक निवडणुकांसाठी ओबीसी प्रवर्गाला आरक्षण देण्याबाबतची अधिसूचना राज्य निवडणूक आयोगानं काढू नये, असा आदेश न्यायालयानं दिला. दरम्यान, हा निर्णय आल्यानंतर ठाकरे सरकारवर भाजपने टीका केली आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षणाला स्थगिती देणारा हा निर्णय आला असल्याची टीका, भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

Previous Post
चंद्रकांत पाटील

‘सरकारने ओबीसी समाजाची फसवणूक केली; आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देणार नाही’

Next Post
obc

ओबीसी आरक्षण : संधीसाधू नेत्यांच्यामागे किती जायचे याचा विचार जनतेने करायला हवा – आप

Related Posts
शेतकऱ्यांच्या आशिर्दावाने नरेंद्र मोदी पंतप्रधान; पण सत्तेत येताच शेतकऱ्यालाच उद्ध्वस्थ करण्याचे धोरण | Nana Patole

शेतकऱ्यांच्या आशिर्दावाने नरेंद्र मोदी पंतप्रधान; पण सत्तेत येताच शेतकऱ्यालाच उद्ध्वस्थ करण्याचे धोरण | Nana Patole

Nana Patole | भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकरी विरोधी असून सोयाबीन, कापूस, ऊस, कांदा, धान उत्पादक शेतकरी अनेक…
Read More
मेट्रो ट्रेन आणि बुलेट ट्रेनमध्ये नेमका काय फरक असतो?

मेट्रो ट्रेन आणि बुलेट ट्रेनमध्ये नेमका काय फरक असतो?

Metro Train and Bullet Train : मेट्रो ट्रेन आणि बुलेट ट्रेन (ज्याला हाय-स्पीड ट्रेन देखील म्हणतात) या दोन्ही…
Read More
Kangana Ranaut | उर्मिला मातोंडकरला 'सॉफ्ट पॉर्न स्टार' म्हणणाऱ्या वक्तव्यावर कंगना राणौतचे स्पष्टीकरण, म्हणाली...

Kangana Ranaut | उर्मिला मातोंडकरला ‘सॉफ्ट पॉर्न स्टार’ म्हणणाऱ्या वक्तव्यावर कंगना राणौतचे स्पष्टीकरण, म्हणाली…

Kangana Ranaut, Urmila Matondkar | कंगना राणौतने तिच्या जुन्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे ज्यात तिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला…
Read More