पावसाळ्यात मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध होणार; एकनाथ शिंदे यांची ग्वाही

पावसाळ्यात मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध होणार; एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुंबई | ( Eknath Shinde) मुंबईतील खड्डेमुक्‍त रस्‍त्‍यांवर कायमस्‍वरूपी उपाय म्हणून काँक्रिटचे रस्ते करण्याचा निर्णय घेतला आहे. हे काँक्रिटचे रस्ते पूर्ण झाल्यानंतर रस्ता खोदला जाणार नाही आणि खड्डे पडणार नाही. त्यामुळे खड्डेमुक्त मुंबई हा संकल्प आम्ही पूर्ण करणार आहोत. रस्त्यांची कामे करताना गुणवत्तेशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे सांगतानाच मे अखेरपर्यंत रस्त्यांचे काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

पावसाळ्यापूर्वी चौक ते चौक (जंक्शन टू जंक्शन) कामे पूर्ण करावीत, रस्ते वाहतूकयोग्य करावेत. मॅनहोल, रस्त्यांलगतचे सांडपाणी वाहिन्‍यांची प्राधान्याने स्वच्छता करावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज दुपारी मुंबई शहर आणि पूर्व उपनगरे विभागातील काँक्रिट रस्ते कामांची पाहणी केली. बॉम्‍बे हॉस्पिटल जवळील चौक येथून रस्ते पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली. त्यानंतर, सी विभाग, एफ उत्तर विभाग, व एम पश्चिम विभाग या विभागांमधील सिमेंट रस्ते कामांची पाहणी करण्यात आली. येणाऱ्या पावसाळ्यात नागरिकांना अपघातमुक्त, खड्डेमुक्त असा सुखकर व सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकारी वर्गाला देण्यात आल्या.

यावेळी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर व संबंधित विभागाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते.

बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सिमेंट काँक्रिट रस्ते प्रकल्पाची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू आहे. आतापर्यंत १ हजार ३३३ किलोमीटर रस्‍त्‍याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्‍त्‍यांची काँक्रिटीकरण कामे दोन टप्‍प्‍यांमध्‍ये सुरू असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात ७०० किलो मीटरचे रस्ते तर दुसऱ्या टप्प्यात काँक्रीटीकरणाचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी ४०० किलो मीटर रस्त्यांचे काम सुरू आहे. एम ४० या ग्रेडचे कॅंक्रीट रस्त्याच्या प्रकल्पाच्या कामासाठी वापरत असून सर्वाधिक भार क्षमता वाहून नेण्याचे त्याचे वैशिष्ट असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

खड्डेमुक्त रस्त्यांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आतापर्यंत १ हजार ३३३ किलोमीटर रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्त्यांचे काँक्रिटीकरण काम दोन टप्प्यांमध्ये हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यामधील एकूण ६९८ रस्त्यांची कामे (३२४ किलोमीटर) तर, दुसऱ्या टप्प्यात एकूण १४२० रस्त्यांचे (३७७ किलोमीटर) काँक्रिटीकरण प्रस्तावित आहे. ही कामे वेळेत पण दर्जेदार पद्धतीने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री  शिंदे ( Eknath Shinde) यांनी दिले.

संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी जबाबदारीचे भान ठेवून काम करावे रस्त्यांची कामे उत्कृष्ट पद्धतीने व्हायला हवी त्यात हलगर्जीपणा नको कामात चूक आढळली तर संबंधितांवर कारवाई केली जाईल. जे अधिकारी चांगले काम करतील त्यांचा नक्कीच सन्मान करू. रस्त्याचे काम करणारा कंत्राटदार आणि संबंधित अधिकारी यांचे नावे आणि संपर्क क्रमांक असलेले फलक रस्त्यांवर लावण्यात यावीत, अशी सुचनाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली.

पाहणी दौऱ्याची सुरुवात दुपारी ए विभागातील बॉम्‍बे हॉस्पिटल जवळील चौक येथून झाली. त्यानंतर, सी विभागातील आर. एस. सप्रे मार्ग; एफ उत्तर विभागातील माटुंगा परिसरातील जामे जमशेद मार्ग आणि एम पश्चिम विभागातील चेंबूर परिसरातील मार्ग क्रमांक २१ इत्यादी रस्ते कामांची पाहणी उपमुख्यमंत्री  शिंदे यांनी केली. तसेच, स्थानिक नागरिकांशी संवाद देखील साधला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप? ‘युवा संघर्ष निर्धार परिषद २०२५’च्या माध्यमातून तीन बड्या नेत्यांची नवी आघाडी

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, शिवसेनेचा बडा नेता भाजपच्या गळाला लागला?

महार रेजिमेंटच्या मुख्यालयामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी मोदींना पोस्ट कार्ड पाठविण्याच्या अभियानाची सुरुवात

Previous Post
माजी आमदार संजय घाटगे, पांडुरंग बरोरा यांचा भाजपामध्ये प्रवेश

माजी आमदार संजय घाटगे, पांडुरंग बरोरा यांचा भाजपामध्ये प्रवेश

Next Post
भरदिवसा भाजप पदाधिकाऱ्याला मारुन रक्ताने माखलेल्या कपड्यांसह आरोपीचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण

भरदिवसा भाजप पदाधिकाऱ्याला मारुन रक्ताने माखलेल्या कपड्यांसह आरोपीचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण

Related Posts
कर्नाटक विधानसभेच्या प्रचारासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांची फौज

कर्नाटक विधानसभेच्या प्रचारासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांची फौज

मुंबई – कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागासाठी निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला असून १० मे राजी मतदान व १३ मे…
Read More
Varanasi Cricket Stadium: डमरू, त्रिशूळ आणि बेलपत्राच्या आकारात बनवले जाणार वारासणी क्रिकेट स्टेडियम

Varanasi Cricket Stadium: डमरू, त्रिशूळ आणि बेलपत्राच्या आकारात बनवले जाणार वारासणी क्रिकेट स्टेडियम

Varanasi Cricket Stadium: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते वाराणसीतील गंजरी येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची (Varanasi…
Read More
शिंदेंच्या अत्यंत जवळच्या 'या नेत्यांनी मारली अयोध्या दौऱ्याला दांडी ? शिंदे गटात नेमकं चाललंय काय ?

शिंदेंच्या अत्यंत जवळच्या ‘या नेत्यांनी मारली अयोध्या दौऱ्याला दांडी ? शिंदे गटात नेमकं चाललंय काय ?

Mumbai – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी अयोध्या दौऱ्यात जोरदार शक्तीपदर्शन केलं.(CM Eknath Shinde In Ayodhya) रविवारी दिवसभरात…
Read More