मुंबई : आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने अनेक धक्कायादक खुलासे केले आहेत. त्यात सर्वात धक्कादायक म्हणेज आर्यन खानला अटक केल्यानंतर शाहरुख खानकडे 25 कोटी रुपये मागण्यात आले होते. त्यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना देण्यात येणार होते आणि बाकीचे वाटून घेण्यात येणार होते.
आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केलं आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. केपी गोसावी आणि सॅम डिसूझाचं मी फोनवरील संभाषण ऐकलं होतं. 25 कोटींचा बॉम्ब टाका. 18 कोटीपर्यंत डील फायनल करू. त्यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असं या दोघांमध्ये संभाषण झाल्याचं साईल यांचा दावा आहे. आपण केपी गोसावी यांचे बॉडीगार्ड असल्याचा दावाही साईल यांनी केला आहे.
दरम्यान, क्रुझवरील धाडसत्राच्या रात्री आपण गोसावी सोबतच असल्याचे साईलने सांगितले आहे. तर, गोसावी आणि सॅम यांना एनसीबीच्या कार्यालयाबाहेर एकत्र पाहिल्याचा दावा देखील प्रभाकर साईल याने केला आहे. गोसावी नाट्यमयरित्या गायब झाला आहे. त्याच्या जीवाला समीर वानखेडेकडून धोका असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या