एनसीबीने 10 कोऱ्या कागदांवर माझी सही घेतली, गोसावीच्या बॉडीगार्डचे धक्कादायक खुलासे

kiran gosavi - prabhakar sail

मुंबई : आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने अनेक धक्कायादक खुलासे केले आहेत. त्यात सर्वात धक्कादायक म्हणेज आर्यन खानला अटक केल्यानंतर शाहरुख खानकडे 25 कोटी रुपये मागण्यात आले होते. त्यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना देण्यात येणार होते आणि बाकीचे वाटून घेण्यात येणार होते.

आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केलं आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. केपी गोसावी आणि सॅम डिसूझाचं मी फोनवरील संभाषण ऐकलं होतं. 25 कोटींचा बॉम्ब टाका. 18 कोटीपर्यंत डील फायनल करू. त्यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असं या दोघांमध्ये संभाषण झाल्याचं साईल यांचा दावा आहे. आपण केपी गोसावी यांचे बॉडीगार्ड असल्याचा दावाही साईल यांनी केला आहे.

तर, एनसीबीने 10 कोऱ्या कागदांवर माझी सही घेतली. तसेच मी गोसावींना 50 लाखांच्या दोन बॅगाही दिल्या होत्या, असंही प्रभाकर साईलनी सांगितलं. 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजून 45 मिनिटाने गोसावीने मला फोन केला होता. तसेच 2 ऑक्टोबर रोजी 7.30 वाजेपर्यंत तयार राहण्यास मला सांगण्यात आलं. गोसावींनी मला काही फोटोही पाठवले होते. फोटोत जे लोक दिसत आहेत, त्यांचे हे फोटो मला दाखवण्यात आले होते. ग्रीन गेटवर याच लोकांची ओळख पटवण्यास सांगितल्याची धक्कादायक माहितीही साईल यांनी दिली आहे.

हे देखील पहा 

https://www.youtube.com/watch?v=Egi–9bLtao

Previous Post
kiran gosavi

25 कोटींचा बॉम्ब टाका, 18 कोटीपर्यंत डील फायनल करू; गोसावीच्या बॉडीगार्डच्या दाव्याने खळबळ

Next Post
ramdas aathwale - sameer wankhede - malik

समीर वानखडेंच्या केसाला जरी धक्का लागला तर याद राखा, रामदास आठवले आक्रमक

Related Posts
sanjay kute

महिला गृहउद्योगाच्या नावाखाली राज्यातील हजारो महिलांची कोट्यवधींची फसवणूक; मुख्य आरोपी फरार

मुंबई – महिला गृहउद्योगाच्या (Mahila Gruh Udyog) नावाखाली राज्यभरातील हजारो महिलांची कोट्यवधींची फसवणूक (Fraud of billions) झाली असून…
Read More

आमदार रवी राणांनी केलेल्या आरोपांची ED, CBI चौकशी व्हावी- कॉंग्रेस

मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे समर्थक आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी राज्याचे माजी मंत्री…
Read More

कमाल, लाजवाब! कोहलीच्या ‘विराट’ खेळीमुळे भारताने २० वर्षांनंतर न्यूझीलंडला विश्वचषकात केले पराभूत

IND vs NZ World Cup: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात धरमशाला येथे विश्वचषकातील २१ वा…
Read More