अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन; मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा 

Mumbai – मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन झालं आहे. प्रदीप पटवर्धन यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या.(Pradeep Patwardhan passes away )

मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप पटवर्धन हे गिरगावात स्थायिक होते. त्यांनी कॉलेज काळापासूनच एकांकिका स्पर्धेत काम केले होते. त्यानंतर कालांतराने ते व्यावसायिक नाटकाकडे वळले. त्यांचे अनेक चित्रपट आणि मालिका आजही तितक्याच लोकप्रिय आहेत. मोरुची मावशी हे त्यांचं नाटक खूप गाजलं.

त्यांच्या जाण्याने ज्याप्रमाणे मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे, त्याचप्रमाणे त्यांचे चाहतेही शोकाकुल झाले आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मोरूची मावशी या नाटकातील त्यांचे काम आजही स्मरणात राहील. भरत जाधव, विजय चव्हाण, विजय पाटकर यांसारख्या दिग्गज कलाकारांसह त्यांनी रंगभूमी गाजवली आहे.